उंदराची मावशी मांजर अशी त्यांची भूमिका, सुषमा अंधारे यांच्या निशाण्यावर आता कोण?
शिल्लक सेना म्हणणाऱ्या देवा भाऊंनी फक्त हा नजारा बघावा. हा फक्त ट्रेलर आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी किती गर्दी असेल हे कळेल. ज्या लोकांना सत्ता मत्ता दिली. ज्यांनी तुम्हाला पंखा खाली घेतले त्यांचे पंख तुम्ही छटायला निघाले? या लोकांना यांची अवकात दाखवलीच पाहिजे.
वाशीम | 21 नोव्हेंबर 2023 : कागद फक्त किरीट सोमय्याच नाही तर आम्ही पण दाखवू शकतो. ईडीने अजूनही भावना गवळी यांची केस बंद केली नाही. सहआरोपी भावना गवळी आहेत. यांनी बेकायदेशीर पध्दतीने माया जमा केली. ईडीला नतमस्तक झाले. तुम्ही निर्दोष आहे तर मग तुमच्यावर आरोप करणाऱ्या किरीट सोमय्यावर अब्रूनुकसानचा दावा का केला नाही? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. घर पेटवणारे हिंदुत्व हे भाजपचे आहे. आमचे हिंदुत्व गोरगरीब यांच्या घरातील चुल पेटवणारे आहे. उंदराची मावशी मांजर अशी भूमिका ही भावना गवळी यांची झाली आहे. पाच वेळा मातोश्रीने तुम्हाला खासदार केलं तुम्ही काय दिलं. मला ही शिंदे यांनी आमदारकी दिली असती पण आम्ही प्रामाणिक आहोत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. देवेंद्र फडणवीस यांनी कपटीपणाचा कळस गाठला आहे. भावना गवळी यांच्यासोबत कोणीही गेलं नाही. उध्दव ठाकरे यांच्याकडे कोणी बोट दाखवत असेल तर त्यांचा समाचार घेतला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

