CM Eknath Shinde: कोण आहे सर्वात मोठा कलाकार? मुख्यमंत्र्यांनी कोणतं गुपीत सभागृहात केलं उघड? देवेंद्र फडणवीस यांनी का मारला डोक्यावर हात?

CM Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडखोरी नाट्याचे पदर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात उलगडले.

कल्याण माणिकराव देशमुख

|

Jul 04, 2022 | 6:45 PM

मुंबईः शिवसेनेच्या बंडखोरी नाट्याचे पदर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी सभागृहात आज उलगडले. या नाट्याचे खरे सूत्रधार(revolt compere) कोण आहेत. बंडखोरीचा ही सर्व योजना शिजली कशी ते मुख्यमंत्र्यांनी थेट सभागृहात जाहीरपणे सांगून टाकले. मुख्यमंत्र्यांच्या या बेधडक वक्तव्यामुळे सभागृहात खसखस पिकली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डोक्यावर हात मारुन घेतला. एवढे ही प्रांजळ बोलायचे नसते असे फडणवीस यांच्या हास्यातून बाहेर आले. या बंडामागचे खरे कलाकार देवेंद्र फडणवीस असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही दोघे कधी भेटायचो हे आमच्या लोकांनाही कधी कळले नाही. आम्ही सर्व आमदार झोपी गेल्यावर भेटायचो. चर्चा करायचो अशी कबुली मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकली. पण या बंडानंतर आपल्यासह आपल्या सहका-यांवर शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी अत्यंत खालच्या स्तरावर आरोप केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेलो नाही, तर तळागाळातून, कष्टकरी वर्गातून इथपर्यंत आल्याचे स्मरण मुख्यमंत्र्यांनी करुन दिले. तसेच सर्वसामान्याला मुख्यमंत्री होण्याचा अधिकार नाही का? असा रोकडा सवाल ही त्यांनी केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें