वाह! सेवानिवृत्त जवानाचं जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

पण कधी सेवानिवृत्त माणसाचं स्वागत झालेलं तुम्ही पाहिलंय का? ते पण एखाद्या जवानाचं? वाशिमच्या एकलासपूरमध्ये सेवानिवृत्त जवानाचे गावात जंगी स्वागत करण्यात आले.

रचना भोंडवे

|

Jul 02, 2022 | 11:04 AM

वाशिम: आपण नवरदेवाचं जंगी स्वागत करताना पाहिलंय. आपण शाळेतल्या मुलांचं शाळा (School) सुरु झाल्यावर जंगी स्वागत केलेलं पाहिलंय. एखाद्या व्यक्तीने बक्षीस मिळवलं तर आपण त्याचं, मंत्र्यांचं, मोठ मोठ्या अधिकाऱ्यांचं जंगी स्वागत झालेलं पाहिलंय. पण कधी सेवानिवृत्त माणसाचं स्वागत (Welcome) झालेलं तुम्ही पाहिलंय का? ते पण एखाद्या जवानाचं? वाशिमच्या (Washim) एकलासपूरमध्ये सेवानिवृत्त जवानाचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. विश्वनाथ कुलाळ असं या जवानाचं नाव आहे. 17 वर्षे भारतमातेची सेवा करून जवान घरी परतलाय, स्वागत तर झालंच पाहिजे ना? बघाच हा व्हिडीओ…

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें