Pune MNS | मनसे-भाजप युती होणार?, पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचं मोठं पाऊल!

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप मनसे युतीच्या चर्चा होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतरही मनसे भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरुच राहिल्या

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप मनसे युतीच्या चर्चा होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन भेट घेतली होती. त्यानंतरही मनसे भाजप कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरुच राहिल्या. आता महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केली आहे. प्रभाग रचनांचा आढावा घेताना ही मागणी करण्यात आलीय. जर महापालिका निवडणुकीत आपण भाजपशी युती केली, तर मनसेला फायदा होईल, अशी भूमिका मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मांडलीय. त्यामुळे लवकरच दोन्ही मुख्य नेत्यांमध्ये तशी बोलणी होऊन युती होऊ शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI