BJP | अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान

वेळ पडली तर चंद्रपूरमध्ये भाजप विरोधी पक्षात बसेल, असं मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरच्या विकासासाठी महापौर पदावर भाजपलाच बसावं लागेल असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपुरातील अनेक अपक्ष नागरसेवक आणि इतर नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात आहेत.

चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर देणार नाही असं स्पष्ट वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. वेळ पडली तर चंद्रपूरमध्ये भाजप विरोधी पक्षात बसेल, असं मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूरच्या विकासासाठी महापौर पदावर भाजपलाच बसावं लागेल असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपुरातील अनेक अपक्ष नागरसेवक आणि इतर नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपचा महापौर बनवत असेल तर अपक्ष नगरसेवक भाजपसोबत हात मिळवणी करायला तयार आहेत, असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महापौर पद हे कोणालाही देता येत नाही गरज पडली तर शहरच्या विकाकासाठी आम्ही विरोधात बसू.