Video | 9 तासांपेक्षा जास्त काम केले तर पडू शकते महागात, आरोग्याला धोका, पाहा WHO चे मत काय ?

9 तासांपेक्षा जास्त काम केले तर पडू शकते महागात, आरोग्याला धोका, पाहा WHO चे मत काय ?

मुंबई : जास्त काम केले की आपला बॉस खूश होईल, या एकाच समजापोटी अनेकजण जीव तोडून काम करतात. कामाचे तास संपल्यानंतरसुद्धा अनेकजण एक ते दोन तास अधिक काम करतात. मात्र, आता जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणापेक्षा जास्त काम केले तर काय होऊ शकते याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धक्कादायक खुलासे केले आहेत. सलग सहा दिवस 9 तास काम केले तर हृदयरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलंय.