निवडणूक आयोग अपंग झालाय! यशोमती ठाकूर यांची खरमरीत टीका
यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगाला अपंग आणि पॅरासाईट संबोधत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दुबार मतदारांची समस्या आणि मतदानात होणारी कथित हेराफेरी अधोरेखित केली, तसेच भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाहीच्या भवितव्यासाठी मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली.
यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधकांचे म्हणणे ऐकून न घेताच निवडणुका जाहीर केल्याचा आरोप करत, त्यांनी निवडणूक आयोगाला अपंग आणि पॅरॅलिटिक म्हटले, तसेच पॅरेसाईटप्रमाणे काम करत असल्याचे सांगितले.
ठाकूर यांनी मतदार याद्यांमधील घोळाकडे लक्ष वेधले. उत्तर प्रदेशमधील रामपूर विधानसभा मतदारसंघाचे उदाहरण देत, त्यांनी अनिस खान नावाच्या व्यक्तीच्या नावाने दोनदा नोंदणी झाल्याचे आणि गैर-मुस्लिम व्यक्तीने त्या मताचा वापर केल्याचे नमूद केले. ही व्होट चोरी असून, असे प्रकार रामपूरप्रमाणे अमरावती, छिंदवाडा किंवा हरियाणामध्येही होऊ शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाजप सत्तेत आल्यानंतर असंवैधानिक पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत, त्यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची मागणी केली.
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?
NCP आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं? पुढील सुनावणी कधी?
ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?

