Yavatmal : धक्कादायक… वर्षभरात लव्ह मॅरेजचा क्रूर अंत, मुख्यध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या, विद्यार्थ्यांना सोबत घेतलं अन्..
यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यध्यापिकेकडून शिक्षक पतीची हत्या करण्यात आली आहे. मुख्यध्यापिकेने आपल्या शिक्षक पतीच्या मद्यप्राशन आणि मारहाणीला कंटाळून विष देऊन त्याला संपवलं आहे.
यवतमाळमधील मुख्यध्यापिका आणि शिक्षक यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. मात्र या लव्ह मॅरेजचा क्रूर अंत झाल्याचे समोर आले आहे. वर्षभरातच या दोघांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. या घटनेमुळे यवतमाळ एकच हादरलं आहे. मुख्यध्यापिकेने शिक्षक पतीला संपवलं त्यानंतर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन या शिक्षकाचा मृतदेह जाळला असल्याची माहिती मिळतेय. यवतमाळमधील एकाच शाळेत निधी मुख्यध्यापिका तर शंतनू देशमुख हा शिक्षक होता. मुख्यध्यापिका निधीने शिक्षक पती शंतनू देशमुखला विष देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुगलवर सर्च करून मुख्यध्यापिकेने विषारी ज्यूस तयार केलं. दारूच्या नशेत असतानाच पतीला विषारी ज्यूर देऊन त्याला संपवलं. चौसाळामधील टेकडीवर निधीनं पतीचा मृतदेह फेकला. यानंतर कोचिंग क्लासमधील तीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पतीचा मृतदेह जाळल्याचे सांगितले जात आहे. शंतनू देशमुखचा अर्धवट जळालेला मृतदेह जंगलात आढळला. वर्षभरापूर्वीच दोघांचा प्रेमविवाह झाला होता. ते दोघेही कुटुंबापासून विभक्त होते. आरोपी मुख्यध्यापिका २५ वर्षाची तर शिक्षक तिचा पती ३२ वर्षांचा होता.