Yogesh Kadam Video : ‘संजय शिरसाट यांच्या मताला महायुतीत महत्त्व नाही, ते…’, शिंदेंच्या दोन मंत्र्यांमध्येच जुंपली
वेळ आली तर ठाकरे-शिंदेनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या विधानावरून आता शिंदे गटातच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाकरे-शिंदे एकत्र आले तर कुणाला हरकत असणार? गरज पडल्यास आम्ही कुठेही उडी मारण्यास तयार! वेळ आली तर ठाकरे-शिंदेनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलं. दरम्यान, संजय शिरसाट यांच्या या विधानावरून आता शिंदे गटातच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर संजय शिरसाट यांच्या विधानाला महायुतीत महत्त्व नसल्याचं थेट गृहराज्यमंत्री आणि शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय. त्यामुळे आता संजय शिरसाट यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पक्षाची भूमिका हे आमचे मुख्यनेते एकनाथ शिंदे ठरवतात. एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले. इतर कुणालाही अधिकार दिले नाहीत. त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत महत्त्व नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी थेट इशारा दिला आहे. दोन्ही शिवसेनेला एकत्र आणण्याचे त्यांनी प्रयत्न करत राहावे. पण एकनाथ शिंदे यांचं काय मत आहे? अन्य आमदारांचं काय मत आहे? याचा विचार करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये हीच अपेक्षाच असल्याचा टोला राणेंनी लगावला आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली

ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..

'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला

'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
