युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा; पवार कुटुंब एकत्र
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला.
मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. या कौटुंबिक समारंभाला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. पवार कुटुंबातील नव्या पिढीच्या या साखरपुड्यामुळे कुटुंबात आनंदाचे आणि एकतेचे वातावरण पसरले. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा मोठ्या थाटामाटामध्ये पुण्यात साखरपुडा पार पडला होता. त्यानिमित्ताने पवार कुटुंबीय एकत्र आले होते. त्यानंतर आज पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत.
मुंबईत झालेल्या या सोहळ्यात पवार कुटुंब एकत्र आले, आणि युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णी यांच्या साखरपुड्याचे फोटो आता प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर समोर आले आहेत. या समारंभाने पवार कुटुंबातील एकजुटीचे दर्शन पुन्हा एकदा घडवले.
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला

