AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता! राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता

पीएम किसान योजनेच्या 11 हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. 10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होईल. असे असले तरी मोदी सरकारने यासाठीही एक मुहूर्त साधलेले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.

PM kisan Yojna : शुभ मुहूर्तावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता! राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Apr 25, 2022 | 5:31 AM
Share

मुंबई : (PM kisan Yojna) पीएम किसान योजनेच्या 11 हप्त्याची उत्सुकता आता शिघेला पोहचली आहे. 10 हप्ता जमा होऊन चार महिने झाले आहेत त्यामुळे 11 हप्ता आता कोणत्याही दिवशी (Farmer) शेतकऱ्यांचा खात्यामध्ये जमा होईल. असे असले तरी (Central Government) मोदी सरकारने यासाठीही एक मुहूर्त साधलेले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. आता 11 व्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होऊ शकतात. गतवर्षीही मे महिन्यातच ही रक्कम शोतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती.

राज्य सरकारकडून पात्र याद्यांची पूर्तता

पंतप्रधान किसान सन्मान योजना ही केंद्राची योजना असली तरी राज्यातील यंत्रणेच्या माध्यमातून लाभार्थी ठरण्याची प्रक्रिया आहे. त्याच अनुशंगाने 11 हप्त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या याद्या केंद्राकडे सपूर्द केल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. गतवर्षीही 15 मे ला ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती.

तर समजा तुम्हीही आहात पात्र

राज्य सरकारने सपूर्द केलेल्या यादीमध्ये तुमचेही नाव आहे का? याची माहिती घेतल्यास खात्रीशीर तुम्हाला लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसानचे खाते चेक करावे लागणार आहे. यावर Rft Signed By State For 11th Installment असा उल्लेख असेल तर तुम्हाला 11 वा हप्ता मिळणार यात कोणतीच शंका नाही.

हप्ता जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरवात

पीएम किसान खात्याची तपासणी करताना जर Waiting For Approval By State असा एसएमएस असेल तर राज्य सरकारकडून पूर्तता झालेली नाही आणि जर FTO is Generated and Payment Confirmation is Pending असा SMS असेल तर मात्र, आपल्या खात्यामध्ये 11 हप्ता जमा होण्याची प्रक्रिया ही सुरु झाली आहे.

आता e-KYC करणे गरजेचे

पीएम किसान योजनेतील अनियमितता टाळण्यासाठी शेतकऱ्यांना आता e-KYC करुनच घ्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता 31 मे पर्यंत मुदत वाढवण्यात आली असली तरी ही प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे. CSC केंद्र किंवा लाभार्थ्याचे खाते ज्या बॅंकेत आहे त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. या योजनेच्या माध्यमातून वर्षाकाठी 6 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. 2 हजार रुपयांचे वर्षात 3 हप्ते सरकारने ठरवून घेतले आहेत. देशातील तबब्ल 12 कोटी 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे.

संबंधित बातम्या :

Onion Market : ‘नाफेड’ कडूनच शेतकऱ्यांची फसवणूक, कांदा खरेदीच्या नावाखाली असा दुजाभाव

Akola : मका पिकाने शेतकऱ्यांना भरभरुन दिले, मुख्य पिकांतून नाहीपण हंगामी पिकातून शेतकऱ्यांचे साधले

Cotton : कापसाचे उत्पादन घ्या, पण फरदडमुळे होणारे नुकसान टाळा, ‘फरदड मुक्त गाव’ मोहिमेत कृषी विभाग बांधावर

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?