Sugarcane Fire : महावितरणचा असा हा ‘शॉक’, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच

| Updated on: Apr 15, 2022 | 12:18 PM

केवळ मराठावाड्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्येही ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत. ऊस गाळपापेक्षा आगीच्या भक्ष्यस्थानीच अधिक जात आहे. इगतपुरी तालुक्यात तर महावितरणचा असा काय कारभार समोर आला आहे की, सर्वांनाच शॉक बसेल. गतवर्षी ज्या विज तारांच्या घर्षणामुळे ऊस जळून खाक झाला होता त्याच क्षेत्रातला ऊस यंदाही शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना घेऊन महावितरण किती गंभीर आहे याची प्रचिती येते.

Sugarcane Fire : महावितरणचा असा हा शॉक, गतवर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती, उसाचे क्षेत्रही अ्न कारणही तेच
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे 12 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नाशिक : केवळ मराठावाड्यातच नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्येही ऊसाला आग लागल्याच्या घटना घडत आहेत.  (Sugarcane Sludge)ऊस गाळपापेक्षा आगीच्या भक्ष्यस्थानीच अधिक जात आहे. (Igatpuri) इगतपुरी तालुक्यात तर महावितरणचा असा काय कारभार समोर आला आहे की, सर्वांनाच शॉक बसेल. गतवर्षी ज्या विज तारांच्या घर्षणामुळे ऊस जळून खाक झाला होता त्याच क्षेत्रातला ऊस यंदाही (Short Circuit) शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना घेऊन महावितरण किती गंभीर आहे याची प्रचिती येते. तालुक्यातील शेणी येथील हा प्रकार असून यामध्ये विष्णू रघुनाथ जाधव व इतर शेतकऱ्यांचा तब्बल 12 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण या सर्वात मोठ्या नगदी पिकातून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

शेती व्यवसायासह संसाराची घडी विस्कटली

शेणी परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. या नगदी पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. याच पिकावर वर्ष भराचा घर खर्च, मोटर लाईट बिल, शिक्षण ,शेतीला लागणारी खते, बी बियाणे, रोपे हे सर्व उसनवारी या ऊसाच्या भरवश्यावरच केली जाते. पण आता तोड काही दिवसांवर य़ेऊन ठेपली असतानाच ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे शेती व्यवसयाचे गणित तर बिघडलेच पण संसाराचा गाडा कसा चालवावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. उसाशिवाय दुसरे पीकच घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

गतवर्षीही शॉर्टसर्किटमुळेच ऊसाचे नुकसान

गतवर्षीही ऊस तोडीला आला असतानाच या क्षेत्राचे शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले होते. असे असतानाही वर्षभरात महावितरणने येथील वीज तारांची दुरुस्ती कामे केली नाहीत. त्यामुळेच यंदाही ही घटना घडली आहे. त्यामुळे महावितरण बद्दल रोष व्यक्त होत असून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. अधिकाऱ्यांनी ऊसाच्या फडाची पाहणी करणेही महत्वाचे समजले नाही तर येथील सब स्टेशनचे धोरणकर यांनी ही जबाबदारी लाईनमन यांच्यावर सोपवली आहे.

महिन्याभरात आगीच्या 5 घटना

गेल्या महिनाभरात इगतपुरी तालुक्यात ऊसाला आग लागण्याच्या 5 घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये महावितरणचा मोठा वाटा आहे. वेळोवेळी विद्युत तारांच्या दुरुस्तीची मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विष्णू रघुनाथ जाधव यांच्यासारख्या शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

संबंधित बातम्या :

Sangli : ह्रदय पिळवटून टाकणारं चित्रं, वीज कोसळल्याने मेंढपाळासह 10 मेंढ्यांचा मृत्यू

Turmeric Crop: वाढत्या उन्हाचा असा ‘हा’ परिणाम, हळद काढणी दिवसा अन् रात्रीतून प्रक्रिया

Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे ‘असे’ करा नियोजन!