Turmeric Crop: वाढत्या उन्हाचा असा ‘हा’ परिणाम, हळद काढणी दिवसा अन् रात्रीतून प्रक्रिया

आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला होता. पीक काढणीनंतर सर्वकाही संपले असे नाही. कारण अनियमित पावसाने उसंत घेतली असली तरी मराठवाड्यात उन्हाचा पारा हा वाढतच आहे. सध्या नांदेडसह हिंगोली, परभणी जिल्ह्यामध्ये हळद काढणीची कामे जोमात सुरु आहेत. काढणीनंतर हळद पक्की बनवण्यासाठी शिजवणे गरजेचे आहे.

Turmeric Crop: वाढत्या उन्हाचा असा 'हा' परिणाम, हळद काढणी दिवसा अन् रात्रीतून प्रक्रिया
वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांना रात्रीतूनच हळद शिजवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:30 AM

नांदेड : आतापर्यंत अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला होता. पीक काढणीनंतर सर्वकाही संपले असे नाही. कारण अनियमित पावसाने उसंत घेतली असली तरी (Marathwada) मराठवाड्यात उन्हाचा पारा हा वाढतच आहे. सध्या नांदेडसह हिंगोली, परभणी जिल्ह्यामध्ये (Turmeric Harvesting) हळद काढणीची कामे जोमात सुरु आहेत. काढणीनंतर हळद पक्की बनवण्यासाठी शिजवणे गरजेचे आहे. पण सध्या (Temperature Increase) उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना सहन होत नसल्याने हळदीवर रात्रीतून प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे दिवसा काढणी कामे आणि रात्रीतून हळद शिजवणे असा प्रकार सध्या शेतशिवारात पाहवयास मिळत आहे.

अशी आहे हळद शिजवण्याची पध्दत

हळद काढणीनंतर पक्की बनवण्यासाठी ती शिवजवणे गरजेचे आहे. वाफेवर ही हळद शिजवण्यासाठी कुक्कर लावला जातो. या कुकरला जळतन घालून निर्माण होणाऱ्या वाफेवर ही हळद शिजवली जाते. याकरिता शेतकऱ्यांना रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे. शिवाय ही प्रक्रिया केल्याशिवाय हळद पक्की होतच नाही. उन्हापासून बचावासाठी सायंकाळी 6 नंतर शेतकरी वाफेची भट्टी सुरु करीत आहेत. 2 तासानंतर वाफ तयार होण्यास सुरवात होते आणि त्या वाफेवर ही प्रक्रिया केली जाते.

पाण्यासाठीही भटकंती

नांदेड जिल्ह्यातील अधिकतर क्षेत्रावरील हळद काढणीची कामे झाली आहेत. आता हळद शिजवण्यासाठी शेतशिवारात भट्ट्या पेटल्या आहेत पण ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कारण जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरु झाले आहे. ग्रामीण भागात अवेळी बत्तीगुल होत असल्याने शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. मात्र, सध्याचा विक्रमी दर पदरी पाडून घेण्यासाठी दिवसभर काढणी कामे आणि रात्रीतून ही प्रक्रिया केल्याशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

उत्पादन घटले, शेतकरी कष्टाचाच धनी

हळद पीक जोमात असतानाच मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. हळद क्षेत्रामध्ये पाणी साचून राहिल्याने कंद सडले गेले. अनेक दिवस पाण्याचा निचराच झाला नसल्याने ही परस्थिती ओढावली होती. आता खराब अवस्थेतील पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडत आहे. शिवाय वाढत्या उन्हामुळे दिवसा हळद शिजवण्याची प्रक्रिया शक्य नसल्याने रात्री भट्ट्या पेटवल्या जात आहेत. हे कमी म्हणून की काय आता भारनियमन सुरु झाल्याने हळद शिजवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

Summer Season: उन्हाळ्यात फळबागांचे योग्य व्यवस्थापन केले तरच उत्पादन भर, लिंबूवर्गीय फळबागांचे ‘असे’ करा नियोजन!

Agricultural Cultivation : शेती व्यवसायावरही इंधन दरवाढीचा परिणाम, खर्च ठरलेला उत्पादन मात्र रामभरोसे

Central Government : Zero Budget शेतीसाठी मोठी आर्थिक तरतूद, शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.