Video | नादखुळा : 1600 किलोचा रेडा कृषी प्रदर्शनात सेंटर ऑफ अट्रॅक्शन, किंमत ऐकून चक्रावून जाल!

| Updated on: Dec 20, 2021 | 1:52 PM

कृषी प्रदर्शनात काहीना काही आकर्षणाचे असतेच. काळाच्या ओघात आता नव्याने येणाऱ्या यांत्रिकिकरणाचे आकर्षण शेतकऱ्यांना कायम राहिलेले आहे. पण सांगलीच्या तासगावात शिवार कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो एक रेडा...आता प्रदर्शणात रेडा यामध्ये काय विशेष असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण या रेड्याचे वजन तब्बल दीड टन तर किमंत तब्बल 80 लाख रुपये.

Video | नादखुळा : 1600 किलोचा रेडा कृषी प्रदर्शनात सेंटर ऑफ अट्रॅक्शन, किंमत ऐकून चक्रावून जाल!
Follow us on

सांगली : (Agricultural Exhibition) कृषी प्रदर्शनात काहीना काही आकर्षणाचे असतेच. काळाच्या ओघात आता नव्याने येणाऱ्या यांत्रिकिकरणाचे आकर्षण शेतकऱ्यांना कायम राहिलेले आहे. पण सांगलीच्या तासगावात शिवार कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो एक रेडा…आता प्रदर्शनात रेडा यामध्ये काय विशेष असा तुम्हाला प्रश्न पडला असेल पण या रेड्याचे वजन तब्बल दीड टन तर किमंत तब्बल 80 लाख रुपये. प्रदर्शनात शेतकऱ्यांसह व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांची तर गर्दी होत आहे पण खरा आकर्षनाचा केंद्रबिंदू ठरत आहे तो मंगसुळी येथील मुरा जातीचा गजेंद्र रेडा. सोमवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र, सोमवारपासून गजेंद्र रेड्याची अशी काय चर्चा सांगलीत रंगलेली आहे की नागरिकांची पावले आपोआप कृषी प्रदर्शनाकडे वळत आहे.

80 लाखाला मागणी तरीही मालकीचा ना..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगतच्या मंगसुळी येथून 1600 किलोचा रेडा दाखल झाला आहे. त्याला बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. या गजेंद्रला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण मालक विलास नाईक यांनी ही घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आता पर्यंत गजेंद्र रेडा कर्नाटकसह चार प्रदर्शनाचे आकर्षानाचे केंद्रबिंदू राहिलेला आहे. दोन दिवसांपासून सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनातही त्याला पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत आहे.

मुरा जातीच्या रेड्याची ही आहेत वैशिष्ट्ये

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मंगसुळी येथील हा गजेंद्र रेडा आहे. 1600 किलो वजन म्हणल्यावर गजेंद्र भाऊंचा खुराकही तसाच आहे. दिवासाला 15 लिटर दूध, ऊस, गवत आधी खाद्य या गजेंद्रला दिवसाला लागते. नाईक यांच्या घरच्या मुरा म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजार किलोमीटरवर वरून लोक पाहण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे गजेंद्र रेड्याचे वजन केवळ 4 वर्षे आहे. त्यामुळे अनेक कृषी प्रदर्शनात रेड्याचा सांभाळ कसा केला जाऊ शकतो हे दाखवून दिले जाणार असल्याचे त्याच्या मालकाने सांगितले आहे.

कोरोनाचे नियम पाळाच पण.. रेड्याला पहाच

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या कृषी प्रदर्शन हे मंगळवारी संपत आहे. सोमवारपासून गजेंद्र रेड्याला पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. मंगळवारी सकाळपासूनच रीघ लागली होती. कृषी प्रदर्शनात कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. नियमांचे पालन करुन कृषी प्रदर्शानातील नाविन्यपूर्ण बाबींची पाहणी करण्याचे आवाहन प्रदर्शनाचे आयोजक महेश खराडे यांनी केले आहे. प्रदर्शनात काल डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

संक्रातीच्या तोंडावर तीळ दराचा कडवटपणा, काय आहेत दर वाढीची कारणे?

वादळ, वारा, अवकाळी अंगावर झेलत शेवटी ‘राजा’ डोलत बाजारात दाखल, मुहूर्ताच्या दराची उत्सुकता शिगेला

शेती सांभाळत सेंद्रिय खत निर्मितीतून लाखोंची कमाई, कोल्हापूरच्या शेतकरी महिलेची प्रेरणादायी कहाणी…