Kharif Season : शेतकऱ्यांना दिलासा..! मोठ्या प्रतीक्षेनंतर नुकसानभरपाईची रक्कम थेट बॅंक खात्यामध्ये, कधी पासून होणार सुरवात?

| Updated on: Sep 09, 2022 | 6:29 PM

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Kharif Season : शेतकऱ्यांना दिलासा..! मोठ्या प्रतीक्षेनंतर नुकसानभरपाईची रक्कम थेट बॅंक खात्यामध्ये, कधी पासून होणार सुरवात?
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते.
Follow us on

औरंगाबाद : निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातून शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्न पडेल की नाही, याबाबत शंका आहे. पण (State Government) राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला असून मध्यंतरीच्या (Heavy Rain) अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले आहे त्याच्या भरपाईपोटी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदतीचे बदललेले निकष आणि नुकसानीचे क्षेत्र लक्षात घेता ही रक्कम जाहीर करण्यात आली आहे. शिवाय सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार अस्याचे राज्याचे (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतिक्षा लवकरच संपणार असून भरपाईची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

जुलै महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. सलग महिनाभर पाऊस लागून राहिला होता. त्यामुळे सोयाबीन, उडीद आणि मूगाचे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या माध्यमातून पंचनामे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ह्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 23 लाख 81 हजार हेक्टरावरील पिकांचे नुकसान झाले होते. शिवाय एका शेतकऱ्यास 3 हेक्टरपर्यंतची नुकसानभरपाई मिळणार आहे.

मराठवाडा विभागासाठी 1 हजार 596 कोटींची तरतूद

अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही बसला होता. शिवाय या विभागात सोयाबीनचा अधिकचा पेरा आहे. त्यामुळे नुकसानीची दाहकता अधिक होती. असे असतानाही मदतीमधून उस्मानाबाद जिल्हा वगळण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 हजार 596 कोटींची तरतूद केली गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या काही दिवसांमध्ये मदतीची रक्कम खात्यावर जमा होणार आहे.

दोन दिवसांमध्ये रक्कम खात्यामध्ये

जुलैमध्ये नुकसान होऊन देखील अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना एक नया पैसा देखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली, शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात मांडला. अखेद दोन दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.