Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे ‘मेगा प्लॅन’, वाचा सविस्तर

| Updated on: Jan 10, 2022 | 11:54 AM

फळगळतीवर राज्य सरकारकून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत आता कृषी विभागाच्या माध्यमातून 30 प्रशिक्षित अशा कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून फळगळतीच्या उपापययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.

Orange fruit: नागपूरी संत्रीची फळगळ रोखण्यासाठी कृषी विभागाचा काय आहे मेगा प्लॅन, वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

नागपूर : दिवसेंदिवस वातावरणातील बदलामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने (orange orchard) संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषत: फळगळतीवर राज्य सरकारकून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याच्या तक्रारी ह्या दिवसेंदिवस वाढत आहेत. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेत आता कृषी विभागाच्या माध्यमातून 30 प्रशिक्षित अशा कृषी पर्यवेक्षकांच्या माध्यमातून (Fruit leakage) फळगळतीच्या उपापययोजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये नेमके काय करावे याचा अंदाज शेतकऱ्यांना येणार आहे.

फळगळती रोखण्यासंदर्भात नाही शिफारस

फळ लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या प्रक्रियेत विद्यापीठाच्या शिफारशी ह्या असतातच. मात्र, संत्रा फळगळतीवर कोणतीही शिफारस नाही. त्यामुळे झालेले नुकसान भरुन काढताच येत नाही. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका हा संत्रा उत्पादकांना होत आहे. त्यामुळे कृषी विभागाने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यात तब्बल 1 लाख 25 हजार हेक्टरावर संत्राची लागवड केली जाते. सर्वाधिक क्षेत्र हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मात्र, हा प्रयोग नागपूरी संत्रीसाठी राबवला जात आहे. फळगळती रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांची शिफारस बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याआधीच्या आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण विषयक केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कोणतीही शिफारस नाही. परिणामी, शेतकरी देखील हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या निवडीही महत्वाच्या

संत्रा फळगळती रोखण्यासाठी कृषी विभागाने एक स्वतंत्र प्रणाली उभी केली आहे. यामाध्यमातून कृषी विभागाने टास्क फोर्सचे गठन केले आहे. यातील कर्मचाऱ्यांना तज्ञांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा प्रकारचे दोन प्रशिक्षण नुकतेच झाले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ हे प्रशिक्षण देत आहेत. गावातील पाच शेतकऱ्यांकडून शिफारशीत उपाययोजनांची अंमलबजावणी करून घेतली जाईल. गावातील इतर शेतकऱ्यांनी तसे न केल्यास निश्‍चितच प्रादुर्भाव वाढणार आहे. त्यामुळे ही प्रणाली इतर शेतकऱ्यांना दाखविणे शक्य होईल, अशी यामागची संकल्पना आहे.

कृषीपर्यंवेक्षकांचे नेमके काम काय?

प्रत्येक हंगामाच्या पूर्वी निवडक पाच संत्रा उत्पादकांना उपायोजना सांगून त्याची अंमलबजावणी करून घेण्याचे काम या कृषी पर्यवेक्षकांकडे असणार आहे. गावातील इतर संत्रा उत्पादकांनी देखील त्यांचे अनुकरण करणे अपेक्षित आहे. अन्यथा फळगळतीचा प्रादुर्भाव कायम राहणार आहे. यापूर्वी संत्रा फळगळतीबाबत कोणतीही उपाययोजनेबाबक कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जात नव्हते पण आता या उपक्रमाचा काय फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या मनात तोच दर बाजारात, खरिपातील केवळ एका पिकाचा शेतकऱ्यांना दिलासा

Chickpea Crop : हरभरा फुलोऱ्यात, घाटीअळीचे करा असे एकात्मिक व्यवस्थापन