AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत कवडीमोल भावाने कलिंगडाची विक्री

बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी टरबूज खरबूजची लागवड केली होती. मात्र यावर्षी वाढलेले क्षेत्र आणि वाढलेली आवक यामुळे टरबूज खरबूजच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे.

Agriculture News : कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत कवडीमोल भावाने कलिंगडाची विक्री
agricultural newsImage Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 19, 2023 | 9:33 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : कमी दिवसात येणारे आणि पैसा कमवून देणारे पीक म्हणून टरबूजच्या आणि खरबूजच्या (watermelon) पिकाकडे (crop) पाहिले जाते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी (farmer) मोठ्या प्रमाणात खरबुजाची लागवड केली होती. बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघणार नसल्याची स्थिती नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी एका एकराला 80 हजार रुपये खर्च केला. परंतु खर्च केलेले पैसे सुध्दा मिळणार नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खरबुजाला योग्य दरही मिळत नसल्याचे चित्र आहे

नंदुरबार जिल्ह्यात जवळपास दोन हजार एकर पेक्षा अधिक क्षेत्रावर कलिंगड आणि खरबुजाची लागवड करण्यात आली आहे. रमजान महिन्यात टरबूज खरबुजाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्या हिशोबाने शेतकरी या पिकांची लागवड करत असतात. मात्र यावर्षी उत्पादन लवकर सुरू झाल्याने यावर्षी शेतकऱ्यांना टरबूज आणि खरबुजाला योग्य दरही मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शेतकरी कवडीमोल दरात या दोन्ही फळांची विक्री करतात. टरबूज आणि खरबूजचा एकरी खर्च जवळपास 80 हजार रुपयांचा आसपास आहे. मात्र दर नसल्याने ही शेतकरी अडचणीत सापडला असून रमजान अजून महिनाभर बाकी आहे. त्यामुळे शेतकरी आता टरबूज खरबूजची नवीन बाजारपेठ शोधत असल्याचं चित्र जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे अशी खंत जयराम गंगा मोरे यांनी व्यक्त केली.

बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी टरबूज खरबूजची लागवड केली होती. मात्र यावर्षी वाढलेले क्षेत्र आणि वाढलेली आवक यामुळे टरबूज खरबूजच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांचं मोठ नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे.

पाडळपूर शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला

तळोदा तालुक्यातील पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. दरम्यान दोन बिबट्यांचे झुंजीत या बिबट्याचा मृत्यू झालाचा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. तळोदा तालुक्यातील रांझणी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावरील पुलाजवळ नाल्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर बिबट्याचे वय दीड वर्ष आहे. दरम्यान पाडळपूर रस्त्यावर पहाटेच्यावेळी बिबट्यांची झुंज होत असल्याचा आवाज येत होता असं ग्रामस्थांनी सांगितले आहे. बिबट्या प्रविण कदम यांच्या शेताजवळील नाल्यात मृतावस्थेत आढळुन आला. घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर ग्रामस्थांनी गर्दी केली. पशुधन विकास अधिकारी डॉ.विकास नवले यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.