जाते तिथे डंका, जगातली सर्वात महागडी गाय, 9 कोटींपेक्षा जास्त, दूध नव्हे ‘हे’ ठरतंय एवढ्या भावाचं कारण

| Updated on: Apr 07, 2023 | 5:26 PM

2009 मध्ये कॅनडात या गायीवर बोली लावण्यात आली. तेव्हा ती 1.2 अब्ज डॉलर्सला विकली गेली. म्हणजे सध्याची तिची किंमत 9 कोटी 81 लाख 63 हजार 600 रुपये एवढी होते.

जाते तिथे डंका, जगातली सर्वात महागडी गाय, 9 कोटींपेक्षा जास्त, दूध नव्हे हे ठरतंय एवढ्या भावाचं कारण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: जगातली सगळ्या महागडी गाय कोणती? तिची किंमत साधारण कितीच्या घरात असेल, असे प्रश्न विचारल्यास काही लाखात वगैरे असं उत्तर येईल. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, जगातली सगळ्यात महागडी गाय (Most Expensive cow in the world) कोट्यवधी रुपये किंमतीत विकली गेली आहे. इस्टसाइड लेविसडेल गोल्ड मिस्सी ही हॉल्स्टीन प्रजातीची गाय आहे. 2009 मध्ये कॅनडात या गायीवर बोली लावण्यात आली. तेव्हा ती 1.2 अब्ज डॉलर्सला विकली गेली. म्हणजे सध्याची तिची किंमत 9 कोटी 81 लाख 63 हजार 600 रुपये एवढी होते. त्यावेळी अमेरिकी डॉलरची किंमत 48 रुपये होती. त्यामुळे या गायीची किंमत 57,6000,000 कोटी एवढी होती.

काय वैशिष्ट्य?

हॉल्सस्टीन प्रजातीच्या गायी जगभरात भरपूर दूध देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मिस्सीचा लीलाव झाला होता, तेव्हा ती दररोज 50 लीटर दूध देत असते. एकदा व्याली तर ती जवळपास १० हजार लीटर दूध देत असे. पण सर्वाधिक दूध देणे हेच या गायीचं वैशिष्ट्य नाही. डेनमार्कच्या खरेदीदाराने केवळ याच कारणासाठी तिची खरेदी केली नव्हती, तर त्यामागे दुसरेही कारण होते.

ईस्टसाइड लेविसडेल गोल्ड मिस्सी ही काळ्या आणि पांढऱ्या रंगाची गाय आहे. 11 नोव्हेंबर 2009 रोजी कॅनडात उक्सब्रिज ओंटारियो येथे मोरसन रोडवर एका शाही लिलावात ही गाय 1.2 अब्ज डॉलरमध्ये खरेदी केली गेली. तिचे मालक आणि होलस्टीन्सचे ब्रीडर ब्लॉयस थॉम्पसन यांना विश्वास होता की, मिस्सी एक दिवस नक्की विक्रम नोंदवेल. पण तिला एवढा भाव येईल, याची त्यांना कल्पना नव्हती.

जिथे गेलं तिथे डंका

मिस्सीने अनेक स्पर्धांमध्ये विक्रम नोंदवलेत. 2009 मध्य वेस्टर्न फॉल नॅशनल शोमध्ये ती ग्रँड चँपियन बनली. 2011 मध्ये मेडिसन, विस्कॉन्सिन येथे वर्ल्ड डेअरी एक्सपोमध्ये ती सर्व प्रजातींमध्ये ग्रँड चँपियन बनली. 2011 मध्येच टोरंटो येथील रॉयल कृषी मेळाव्यात सर्वोच्च ग्रँड चँपियनशिप मिळाली. 2012 मध्ये मिस्सीला होल्स्टीन कॅनडा काऊ ऑफ द ईयर घोषित करण्यात आलं.

दूधशिवाय आणखी कोणतं कारण?

मिस्सीमध्ये काही आनुवंशिक गुण आहेत. मिस्सीतील जनुकांचा उपयोग करून आणखी उत्तम प्रजाती तयार करता येते. हॉल्स्टीनची सर्वोत्कृष्ट प्रजाती तयार करण्यासाठी डेनमार्कच्या ब्रीडरनी मिस्सीला 1.2 दशलक्ष डॉलर्सची किंमत देऊन खरेदी केले. मिस्सीने जन्म दिलेल्या वासरांनाही लाखो रुपयांची किंमत आली.