AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी पाण्यात रसरशीत फळं, कोरडवाहू पट्ट्यात फुलवला संत्रा माळ, मिळाले लाखोंचे उत्पन्न

Orange Farming : कोरडवाहू पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगरमधील या भागातील एका शेतकऱ्याने चमत्कार घडवला आहे. त्याने कमी पाण्यात संत्रा बाग फुलवली आहे. त्याला या शेतीतून लाखो रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

कमी पाण्यात रसरशीत फळं, कोरडवाहू पट्ट्यात फुलवला संत्रा माळ, मिळाले लाखोंचे उत्पन्न
संत्रा बागImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Mar 06, 2025 | 2:03 PM
Share

पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक आणि नगदी पीक देणार्‍या शेतीकडे वळाले आहेत. कमी पाणी उपलब्ध असलं तरी चांगलं नियोजन केलं तर चांगल्या उत्पन्नाची पीक घेता येऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण अहिल्यानगरच्या भोसे येथील अशोक टेमकर यांनी दाखवून दिले आहे. टेमकर, संत्रा बागेच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. अडीच एकर वरील संत्रा बाग त्यांना वर्षाला दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा देत आहे. त्याची पंचक्रोशीत एकच चर्चा होत आहे.

वरूण राजाची अवकृपा

अहिल्यानगर जिल्ह्यातील हे आहे भोसेगाव या परिसरात 350 ते 400 मिली पाऊस पडतो. कमी पाऊस असल्यामुळे या भागातील शेतकरी पारंपारिक खरीपाची पिके घेतात. मात्र मागील काही वर्षांपासून भोसे गावातील शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. प्रत्येक शेतकर्‍याकडे छोटी-मोठी फळबाग आहे. यात डाळिंब आणि संत्रा बाग या भागात जास्त पाहायला मिळते.

अशोक टेमकर यांना 16 एकर शेती आहे. यातील अडीच एकरवर त्यांनी 750 संत्र्यांची झाड लावली आहेत. बारा बाय बारा अंतरावर असलेल्या या संत्रा झाडांना सरासरी 40 ते 60 किलो संत्र्याचे उत्पन्न मिळत आहे. एक वेळेस पीक घेण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत खर्चही येतो. यावर्षी संत्रा बागेतून त्यांना दहा लाख रूपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.

संत्रा बाग

देशातील प्रमुख बाजारात संत्रा विक्री

परिसरात बागांची संख्या वाढल्यामुळे गावातच व्यापारी देखील तयार झाले आहेत त्या परिसरातील बागांमध्ये मिळणारी फळ दर्जेदार असल्यामुळे त्यांना चांगली मागणी ही आहे. मुंबई दिल्ली या बाजारासोबतच दक्षिणेकडील बाजारातही या भागातील फळांना मागणी असते. सध्या चांगला भाव असल्यामुळे व्यापार्‍यांना देखील चांगला नफा मिळत आहे.

पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकर्‍यांना पिकांसाठी खर्च केलेले पैसेही मिळणं अवघड होतं आहे. आशात आधुनिक शेतीची कास धरत आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीच्या जोरावर चांगली पिके घेता येऊ शकतात आणि चांगलं उत्पन्नही मिळवता येतं. थोडं पाणी उपलब्ध असलेल्या शेतकर्‍यांनी आता फळबागांकडे वळल्यास त्यांचा फायदा होईल यात शंका वाटत नाही.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.