Farmer : शेतकऱ्यांनो सावधान, जमिन खरेदी-विक्रीमध्ये होऊ शकते फसवणूक..! बातमी वाचा अन् धोका टाळा

अनेक वेळा असेही होते की इसार म्हणजेच अनामत रक्कम ही एका शेतकऱ्याकडून घ्यायची आणि व्यवहार मात्र दुसऱ्याबरोबरच करायचे. दुसऱ्या शेतकऱ्याचा व्यवहार पूर्ण झाला की पहिल्या शेतकऱ्याची ही फसवणूक होते. त्यामुळे इसार पावतीवर अवलंबून न राहता लागलीच व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे.

Farmer : शेतकऱ्यांनो सावधान, जमिन खरेदी-विक्रीमध्ये होऊ शकते फसवणूक..! बातमी वाचा अन् धोका टाळा
राजेंद्र खराडे

|

Jun 26, 2022 | 6:21 PM

मुंबई :  (Farm land) शेत जमिनीच्या खरेदी-विक्रीत फसवूक अशा अनेक घटना आपल्या आवती-भोवती सुध्दा घडतातच. मात्र, याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. यामध्ये एकच शेतजमिनीवर अनेक (land dealings) व्यवहार होतात किंवा कागदपत्रांची जुळवाजुळव करुन नव्याने व्यवहार केले जातात. यामध्ये फसवणूक मात्र शेतकऱ्यांची होते. शेत जमिनीचे व्यवहार तसे शेती व्यवसायाला कलाटणी देणारे असतात. त्यामुळे (Buying and Selling) खरेदी-विक्रीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी योग्या ती काळजी घेणे आवश्यक आहे. एकदा व्यवहार झाला की पश्चातापाशिवाय पदरी काहीच उरत नाही. त्यामुळे कशी होते व्यवहारात फसवणूक आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी हे माहिती असणे गरजेचे झाले आहे.

 1. कशा पध्दतीने होऊ शकते फसवणूक?

  शेतीचा व्यवहार होण्यासाठी आवश्यक असतात ती कागदपत्रे आणि मूळ मालक. मात्र, बनावट कागदपत्रे तयार करुन मूळ मालकाद्वारे नाही तर इतरांकडूनच जमिनीचे व्यवहार होतात. व्यवहार करताना लक्षात येते की जमिनीचा मूळ मालक हा वेगळाच आणि विक्री करणारा हा वेगळाच मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

 2. तर काही वेळेस जमिन एकच आणि अनेक व्यवहार असेही घ़डून येते. यामध्ये ज्यावेळेस व्यवहार होतो त्यानंतर खरेदीखत हे रजिस्टर केले जाते. यानंतर सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद केली जाते. व्यवहार पूर्ण होऊन प्रत्यक्ष ज्याने खरेदी केली आहे त्याचे नाव लागण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागतोच. मात्र, दरम्यानच्या काळातच खरेदी खताचा वापर करुन मूळ मालक तो इतर शेतकऱ्यालाही विकू शकतो
 3. अनेक वेळा असेही होते की इसार म्हणजेच अनामत रक्कम ही एका शेतकऱ्याकडून घ्यायची आणि व्यवहार मात्र दुसऱ्याबरोबरच करायचे. दुसऱ्या शेतकऱ्याचा व्यवहार पूर्ण झाला की पहिल्या शेतकऱ्याची ही फसवणूक होते. त्यामुळे इसार पावतीवर अवलंबून न राहता लागलीच व्यवहार पूर्ण करणे गरजेचे आहे.
 4. जमिन एकाकडे गहाण ठेवायची आणि त्यावरच बॅंकेकडून कर्जही घ्यायचे असेही प्रकारही समोर येतात. यामध्ये कर्जाचा बोजा सातबाऱ्यावर येण्यापूर्वीच दुसऱ्याला जमिन खरेदी करायची. त्यामुळे कर्ज आणि जमिनीवरील बोजा हा तपासला गेला पाहिजे.
 5. वारसांचा हक्क हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. साताबाऱ्यावर नेमक्या किती वारसदारांची नावे आहेत हे पाहूनच खेरदी करणे गरजेचे आहे. अन्यथा खरेदी नंतर एखाद्या वारसाने हक्क सांगितला तर व्यवहार अडचणीचे होतात. त्यामुळे तलाठ्याकडून सातबारावरची वारसांची नावे तपासणे गरजेचे आहे.
 1. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यावर काय आहे पर्याय ?

  सर्व काळजी घेऊन तरी फसवणूक झालीच तर मात्र संबंधिताला तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे. व्यवहारातून आर्थिक फसवणूक झाली असेल तर पोलिसांमध्येही तक्रार नोंदवता येणार आहे.

 2. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी कागदपत्रांची तापसणी करणे गरजेचे आहे. शिवाय यासाठी कुणावर विश्वास न ठेवता स्वत: कागदपत्रांची तपासणी कऱणे गरजेचे आहे.
 3. जमिन खरेदी करताना सातबारा उतारा आणि फेरफार महत्वाचा आहे. याची तपासणी ही तलाठ्याकडूनच करावी लागणार आहे. सातबाऱ्याबरोबर आठ – अ उताराही तापासून घेणे गरजेचे आहे. जमिनीवर कर्जाचा बोजा आहे का याची शहनिशा करुनच व्यवहार करणे गरजेचे आहे. शेतजमिनीतूनच एखादा मार्ग गेला आहे का याची माहितीही घेणे गरजेचे आहे.
 4. शेजमिन खरेदी करायची म्हणल्यावर ती कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत येते पाहणे महत्वाचे आहे.सातबाऱ्यावर त्याची नोंद केलेले असते. जमीन विक्री करणाऱ्याच्या स्वत:च्या मालकीची असून ती खरेदी करताना विशेष अडचण येत नाही त्याला भोगवटादार वर्ग पध्दत म्हणतात.
 5. जमिन खरेदी करताना नकाशे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. त्यामुळे जमिनीची हद्द कळते. नकाशाप्रमाणे जमिनीची हद्द तपासून घेतल्यास अडचण निर्माण होत नाही तर चतु:सीमा कळते.चारही बाजूंना कोणते गट नंबर आहेत, याची माहिती मिळते.
 6. शेतजमिनीसाठी शेतरस्ता हा महत्वाचा आहे. सर्वात म्हणजे जमिन बिनशेतीची असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. असे नसल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करावी लागणार आहे.
 7. कागदपत्रांची पूर्तता करुन आवश्यक ते शुल्क भरुन खरेदीखत करावे लागणार आहे. ही सर्व काळजी घेतली तरच व्यवहार चांगला होणार आहे. त्यामुळे मूळ मालक कोण हे देखील लक्षात येते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें