Budget 2024 | पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार? केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गिफ्ट

| Updated on: Jan 06, 2024 | 1:44 PM

Budget 2024 | केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. लोकसभा 2024 निवडणूकीच्या तोंडावर प्रत्येक वर्ग, क्षेत्र या बजेटकडे डोळे लावून बसले आहे. देशातील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे.

Budget 2024 | पीएम किसान योजनेची रक्कम वाढणार? केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गिफ्ट
PM Kisan Yojana
Follow us on

नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एका महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे. जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात. मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना मालाला किमान हमीभाव, कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत. लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार फुल नाही पण फुलाची पाकळी तरी देईल, अशी बळीराजाचा अपेक्षा आहे. 2024 या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसानचा हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तीन ऐवजी होतील चार हप्ते

पीएम किसान योजनेत केंद्र सरकार एक बदल करु शकते. सध्या या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. त्याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. दर तीन महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

हे सुद्धा वाचा

ही पण एक शक्यता

सूत्रानुसार, पीएम किसान योजनेत घसघशीत वाढ होऊ शकते. वार्षिक 6000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेतंर्गत तीन टप्प्यात 6000 रुपये जमा होतात. ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती. हा हप्ता 50 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 2000 रुपयांऐवजी योजनेचा हप्ता 3000 रुपये असेल. सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात. त्याऐवजी 3000 रुपयांचे तीन हप्ता जमा करण्यात येतील.

तिजोरीवर येईल ताण

एका सरकारी अधिकाऱ्यानुसार, पीएम किसान योजनेतील रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर 20,000-30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल. पण आगामी निवडणुकीचे वारे पाहाता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकते.

लवकरच जमा होणार 16 वा हप्ता

पीएम किसान योजनेचा 15 हप्ता जमा करण्यात आला आहे. योजनेचा 16 हप्ता लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात जमा होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार या योजनेतंर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्या दरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. अजून याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.