Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गुडन्यूज! सलग दुसऱ्या दिवशी भावात घसरण

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने ग्राहकांसाठा यावर्षाच्या सुरुवातीला सलग दुसऱ्या दिवशी आनंदवार्ता आणली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम दोन्ही धातूंवर दिसून आला. सलग दुसऱ्या दिवशी या धातूत घसरण दिसून आली. भाव घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना खरेदीसाठी लगबग करता येईल.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची गुडन्यूज! सलग दुसऱ्या दिवशी भावात घसरण
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 8:30 AM

नवी दिल्ली | 5 जानेवारी 2024 : या वर्षाच्या सुरुवातीला सोने-चांदीने पुन्हा आनंदवार्ता दिली. सलग दुसऱ्या दिवशी किंमतीत घसरण झाली. दोन दिवसांत किंमती घसरल्याने ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे. गेल्या वर्षी दिवाळीपासून सोने-चांदीने मोठी मुसंडी मारली. मौल्यवान धातूच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. डिसेंबर महिन्यातील शेवटच्या सत्रात या दोन्ही धातूंनी मोठी झेप घेतली. आतापर्यंतच्या उच्चांकाचे सर्व रेकॉर्ड तोडले. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. या वर्षाच्या सुरुवातीला पण ही घौडदौड कायम होती. पण गेल्या दोन दिवसांत सोने जवळपास 700 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी आपटली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 5 January 2024)

सोन्यात झाली मोठी घसरण

डिसेंबर महिन्यात सोन्याने दरवाढीचा नवीन उच्चांक गाठला होता. सोने जवळपास 66 हजारांच्या जवळपास पोहचले होते. नवीन वर्षातही दरवाढीचे सत्र कायम होते. 2 जानेवारी 2024 रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. तर 3 जानेवारीला भाव 270 रुपयांनी घसरले. 4 जानेवारी रोजी भाव 440 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा आपटी बार

गेल्यावर्षाच्या शेवटच्या महिन्यात चांदी जोरदार उसळली. नवीन वर्षात दरवाढ सुरु होती. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला. तर 3 जानेवारी रोजी 300 रुपयांनी किंमती घसरल्या. 4 जानेवारी रोजी भाव 2000 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,774 रुपये, 23 कॅरेट 62,523 रुपये, 22 कॅरेट सोने 57501 रुपये झाले. 18 कॅरेट 47,081 रुपये, 14 कॅरेट सोने 36,723 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,779 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.