AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याच्या उद्देशाने साठवणूक ? बियाणे कंपन्यांमध्ये उडाली खळबळ

बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन बियाणांच्या अनधिकृत साठ्यावर कृषी विभागाची धाडी टाकायला सुरुवात केली आहे, एका सव्वा कोटी रुपयांचे सोयाबीन बियाणे आढळून आले आहे. चिखली MIDC भागातील गोडाऊन सिल करण्यात आले आहे. त्याचबरोबर 4 जणांविरुद्ध चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Agriculture News : खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याच्या उद्देशाने साठवणूक ? बियाणे कंपन्यांमध्ये उडाली खळबळ
Buldhana Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2023 | 9:10 AM
Share

बुलढाणा : बुलढाणा (buldhana) जिल्ह्यात कृषी विभागाने (agricultural department) चिखली (chikhali) येथे मोठी कारवाई केली आहे. चिखली एमआयडीसी भागात असलेल्या एका गोडाऊनवर काल रात्री बुलढाणा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्यावेळी धाडीत तब्बल एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये सोयाबीन बियाणांचा एक कोटी वीस लाख रुपये किमतीचा साठा कृषी विभागाकडून जप्त करण्यात आला. चिखली एमआयडीसी परिसरातील एका गोदामात अवैधरित्या सोयाबीन बियाणांचासाठा जमा केला जात असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाली होती.

Buldhana

Buldhana

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याकरता

माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने एक पथक तयार करून त्या संबंधित गोडाऊन वर धाड टाकली. तब्बल सव्वा कोटी रुपये किमतीचा सोयाबीन बियाणे त्या गोडाऊनमध्ये आढळून आले, त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ माजली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट करण्याकरता बियाणांची साठवणूक केली जात असल्याचा हा प्रकार असल्याची सगळीकडं चर्चा आहे. याप्रकरणी कृषी विभागाकडून सदर गोडाऊन सिल करण्यात आले असून चिखली पोलीस स्थानकात चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरीपाच्या तोंडावर बियाने साठवणुकीचं रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईने अवैधरित्या बियाणे साठवणूक करणाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. तर हे बियाणे ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीचे असल्याचे माहिती जिल्हा कृषी अधीक्षक, मनोज ढगे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांचे डोळे सध्या पावसाकडे लागले

शेतकऱ्यांचे डोळे सध्या पावसाकडे लागले आहेत. खरीप हंगामाच्या मशीगतीची तयारी पूर्ण झाली असून शेतकरी सध्या कोणते बियाणे घ्यायचे या विचार करीत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घ्यायला सुरुवात केली आहे. मागचे रब्बी आणि खरीप हंगाम पावासामुळे वाया गेले, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पुन्हा चांगली तयारी केली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...