Bail Pola : जवळचे गेले विरोधात, पण सोन्या बैलाची थाप, तुमच्यामुळेच सुरक्षित, उद्धव ठाकरेंसाठीचा संदेश राज्यभरात चर्चेत

| Updated on: Aug 26, 2022 | 6:47 PM

बैल पोळ्याचे महत्व विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अधिकचे असते. या दिवशी बैलजोडीने केलेल्या कामाच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. शिवाय बैलावर साजश्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोन्या अन् शिल्याची बैलजोडी ही वेगळ्याच बाबीने चर्चेत आली आहे.

Bail Pola : जवळचे गेले विरोधात, पण सोन्या बैलाची थाप, तुमच्यामुळेच सुरक्षित, उद्धव ठाकरेंसाठीचा संदेश राज्यभरात चर्चेत
बैलपोळ्याच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने दिलेला संदेश
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

सोलापूर : राजकारणामध्ये काहीही होऊ शकते हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या अडीच महिन्यात पाहिले आहे. मात्र, राज्य कोरोनाच्या विळख्यात असाताना केलेले कार्य कोणी विसरु शकत नाही. कोरोना काळात (Uddhav Thackeray) माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख यांनी केलेल्या कार्याची दखल जगाने घेतली. एवढेच नाहीतर या कार्याची चर्चा आता नव्याने होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. आज (Bail Pola) बैलपोळा, बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. मात्र, बार्शी तालुक्यातील एका बैलाने याच दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानून त्यांच्या योगदानाची जाणीव करुन दिली आहे. पोळ्याच्या दिवशी बैलावर साजश्रृंगारही केला जातो, पण बार्शीतील (Farmer) अविनाश कापसे यांच्या बैलाच्या पाठीवर झुली नाही लिहण्यात आलेला एक संदेश राज्य़भर व्हायरल होत आहे, मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे. अशा आशयाचा संदेश बैलाच्या पाठीवर लिहण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळचे दुरावले तरी सोन्या बैलाची थाप असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सोन्या अन् शिल्याची जोडी

बैल पोळ्याचे महत्व विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात अधिकचे असते. या दिवशी बैलजोडीने केलेल्या कामाच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. शिवाय बैलावर साजश्रृंगार करुन ढोल-ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र, जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सोन्या अन् शिल्याची बैलजोडी ही वेगळ्याच बाबीने चर्चेत आली आहे. यामधील सोन्याच्या पाठीवरील जो संदेश आहे तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्याचे राजकारण काही का असेना पण कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे असाच संदेश पोळ्याच्या दिवशी देण्यात आल आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मानले आभार

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अविनाश कापसे यांच्याकडेही बैलजोडी आहे. त्यांच्या सोन्या नावाच्या बैलाच्या पाठीवर, मुख्यमंत्री म्हणून तुमचे योगदान विसरता येणार नाही, माझा बळीराजा कोरोना काळातही तुमच्यामुळे सुरक्षित राहिला आहे. म्हणजेच बळीराजाचा सुरक्षित राहिला तो तुमच्यामुळेच, या दरम्यानच्या काळात बळीराजावर संकट ओढावू दिले नाही म्हणून सोन्या बैलानेच त्यांचे आभार मानले आहेत.

हे सुद्धा वाचा

बैल पोळ्याची अशी ही परंपरा

पोळा हा बैलांचा सण आहे. गेल्या अनेक दिवसांची परंपरा शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. श्रावण महिन्याच्या अंतिम टप्प्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या सुरवातीला हा उत्सव पार पडतो. वर्ष शेतामध्ये राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखा असणाऱ्या बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते तो खांदा मळला जातो. शिवाय खांदामळणी आणि पोळ्या दिवशी बैलजोडी ही स्वच्छ धुतली जाते. एवढेच नाहीतर या दोन दिवसांमध्ये कोणतेही काम करुन घेतले जात नाही.