फेब्रुवारीतच खाद्यतेलाला महागाईची फोडणी, दर भडकण्याची शक्यता

| Updated on: Mar 29, 2022 | 10:55 AM

भारतात, पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 4% वाढल्या, तर मोहरीच्या तेलामध्ये 8.7% वाढ झाली. सोयाबीन तेलाचे दर 0.4% किरकोळ घसरले, तर वनस्पती तेलाच्या किंमती 2.7% वाढले. भुईमुगाचे तेलाचे दर 1% वाढले होते.

फेब्रुवारीतच खाद्यतेलाला महागाईची फोडणी, दर भडकण्याची शक्यता
खाद्यतेल
Follow us on

 मुंबई : रशिया-युक्रेन संघर्षाच्या (Russia-Ukraine Conflict) पार्श्वभूमीवर भारतात फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती भडकल्या. तसेच या किंमती अजून वाढण्याची शक्यता आहे. ब्रँडेड सूर्यफूल, वनस्पती, मोहरी आणि भुईमुगाच्या तेलाच्या किंमतीत दरमहा वाढ झाली आहे, असे रिटेल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म बिझोमच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. युक्रेन आणि रशिया हे सूर्यफूल तेल या प्रमुख पुरवठादारांपैकी एक आहेत, जे खाद्यतेलाच्या जागतिक मागणीचा महत्त्वपूर्ण भाग पूर्ण करतात. भारतात तेलवर्गीय पिकांचा पेरा जसा घटला आहे, तसे गेल्या 20 वर्षांपासून भारत हा खाद्यतेलाचा जागतिक पातळीवर सर्वात मोठा आयातदार (Importer) झाला आहे. भारतात, पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 4% वाढल्या, तर मोहरीच्या तेलामध्ये 8.7% वाढ झाली. सोयाबीन तेलाचे दर 0.4% किरकोळ घसरले, तर वनस्पती तेलाच्या किंमती 2.7% वाढले. भुईमुगाचे तेलाचे दर 1% वाढले होते. भारतात दरवर्षी अंदाजे 2.5-3 दशलक्ष टन सूर्यफूल तेलाचा वापर होतो. यातील जवळपास 70% युक्रेनमधून आयात करण्यात येते.. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, 2021 मध्ये युक्रेन आणि रशियाचा मिळून भारताच्या सर्व खाद्यतेलाच्या आयातीपैकी सुमारे 13% वाटा होता, जो 1.6 दशलक्ष टन पुरवठा करतो.

शेंग तेलाच्या दरात वाढ

भारतात, पॅकेज्ड सनफ्लॉवर तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये अनुक्रमे 4% वाढल्या, तर मोहरीच्या तेलाने 8.7% वाढ केली. सोयाबीन तेलाचे दर 0.4% किरकोळ घसरले, तर वनस्पती 2.7% वाढले. भुईमुगाच्या तेलात 1% वाढ झाली होती. पाम तेल, जे भारतीय घरांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते, ज्याची किंमत उच्चांकी पातळीवर पोहचली होती, त्याच्या किंमती अनेक दिवसानंतर 12.9% कमी झाल्या आहेत. फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत पाम तेलाच्या किंमती अजूनही 22.9% वर आहेत.

‘बिझोमने’ आकडेवारी काय सांगते?

बिझोमने (Bizom) भारतातील 7.5 दशलक्ष किरकोळ दुकानांमध्ये पॅकेज केलेल्या ग्राहक वस्तूंच्या विक्रीचा मागोवा घेतला. त्यानुसार, सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाहीत भारतातील खाद्यतेलाच्या किंमतीत काही प्रमाणात सुधारणा झाली होती. जानेवारीत, बिझोमच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांच्या उच्चांकी किंमतीपेक्षा सध्या खाद्यतेलाच्या दरात 10-30% घट झाली आहे.

युध्दाचा परिणाम थेट किचनपर्यंत

बिझोमचे मुख्य विपणन अधिकारी अक्षय डिसोझा यांनी सांगितले की, सरकारने लादलेल्या निर्बंधांमुळे गेल्या दोन तिमाहींमध्ये खाद्यतेलाच्या किंमतीत काही प्रमाणात स्थैर्य आले असले, तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे हा ट्रेंड बदलला आहे.युक्रेनमधून प्रमुख आयात होणाऱ्या सूर्यफूल तेलाचे भाव लगेच वाढल्याचे दिसून आले आहे. युद्धाचा प्रभाव वाढत असल्याने आणि रशियावर निर्बंध लादले जात असल्याने किंमती अधिक भडकण्याची शक्यता आहे,” असे डिसूझा म्हणाले. खाद्यतेलाच्या किंमतीत दरवर्षी 15-20% वाढ झाली आहे, असे बीएनपी परिबास इंडियाचे इंडिया इक्विटी रिसर्चचे प्रमुख कुणाल व्होरा यांनी 17 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या इंडिया कन्झ्युमर प्राइस ट्रॅकरच्या अहवालात म्हटले आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहता, खाद्य तेलाच्या किंमती पुन्हा वाढणार असल्याचे व्होरा यांनी स्पष्ट केले. कोविडपूर्व 2020 पेक्षा खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यात सूर्यफूल तेलाच्या किंमती 50 टक्क्यांनी, तर वनस्पती तेलाच्या किंमती 58 टक्क्यांनी आणि सोयाबीन तेलाच्या किंमती जवळपास 20 टक्क्यांनी वाढल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

कापसाला Record Break दर, हंगामाच्या अंतिम टप्प्यात ‘पांढऱ्या सोन्या’ला अधिक झळाळी, आवकही वाढली

Nanded : उन्हाळी हंगामात नवनवीन प्रयोग, उत्पन्न वाढीसाठी प्रथमच तिळाच्या क्षेत्रात वाढ

Buldhana : ऐकावे ते नवलच, अधिकारीच विकतात शेतकऱ्यांच्या जमिनी, शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

https://www.youtube.com/shorts/G55qOcxrIak