AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton : …म्हणूनच कापसाचे दर वाढले, कृषी विभागाच्या पीक कापणीच्या प्रयोगात काय समोर आले?

खरीप हंगामातील कापूस असे एक पीक होते ज्याचे हंगामाच्या सुरवातीपासूनच याचे दर वाढत आहेत. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात हे दर अणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व कशामुळे होत होते याचे वास्तव कृषी विभागानेच समोर आणून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे लातूर विभागातील पीक कापणी प्रयोग पार पडला असून यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे.

Cotton : ...म्हणूनच कापसाचे दर वाढले, कृषी विभागाच्या पीक कापणीच्या प्रयोगात काय समोर आले?
यंदा वातावरणातील बदलामुळे कापसाच्या उत्पादकतेमध्ये घट झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 09, 2022 | 11:49 AM
Share

लातूर :  (Kharif Season) खरीप हंगामातील कापूस असे एक पीक होते ज्याचे हंगामाच्या सुरवातीपासूनच याचे दर वाढत आहेत. शिवाय हंगामाच्या अंतिम टप्प्यात हे दर अणखी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे सर्व कशामुळे होत होते याचे वास्तव (Agricultural Department) कृषी विभागानेच समोर आणून दिले आहे. दरवर्षीप्रमाणे लातूर विभागातील पीक कापणी प्रयोग पार पडला असून यंदा  (Cotton Production) कापसाच्या उत्पादनात घट झाल्याचे समोर आले आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम हा कापूस पीकावरच झाला आहे तर प्रतिकूल परस्थितीमध्येही सोयाबीन उत्पादकतेमध्ये वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्या पाच वर्षातील उत्पादकतेक्षा यंदा कापूस वगळता इतर पिकांच्या उत्पादकतेमध्ये किंचित वाढ झाली आहे.

कपाशीच्या उत्पादकतेमध्ये एक क्विंटलची तफावत

कपाशीची पाच वर्षाची उत्पादकता ही हेक्टरी 3 क्विंटल 60 कोलो एवढी होती. मात्र, वातावरणातील बदल आणि बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात तब्बल 2 क्विंटलची घट झाली आहे. प्रत्यक्षात 2 क्विंटल 60 कोलो एवढेच उत्पादन झाले आहे. घटत्या उत्पादनाबरोबरच कापसाचे क्षेत्रही कमी झाले आहे. कापसासाठी प्रतिकूल परस्थिती आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या पावसामुळेच हा परिणाम झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

आगामी हंगामात कापसाच्या क्षेत्रात होणार वाढ

यंदा कापसाचे उत्पादन घटले असले तरी प्रत्यक्षात विक्रमी दर कापसाला मिळत आहे. कापसामुळे क्षेत्र पडीक राहते शिवाय बोंडअळीचा प्रादुर्भाव इतर पिकांवरही होत असल्याने क्षेत्रात मोठी घट झाली होती. पण संपूर्ण हंगामात कापसाचे दर हे चढेच राहिलेले आहेत. त्यामुळे आगामी हंगामात कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. त्यामुळे विक्रमी दरामुळे आगामी हंगामात चित्र वेगळे असणार आहे. मात्र, खरिपातील सोयाबीन, मूग, तूर, उडीद या पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ झाली आहे.

पीक कापणीचा फायदा काय?

पीक विमा कंपनीकडून गेल्या पाच वर्षातील उत्पादकता ही तपासली जाते. गेल्या पाच वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन कमी असेल तरच नुकसानभरपाई दिली जाते. अन्यथा नुकसान झाले असे ग्राह्यच धरले जात नाही. त्यामुळे आता कृषी सहसंचालक कार्यालयाकडे हे अहवाल तर जमा झाले आहेत. उर्वरीत दोन जिल्ह्याचे अहवाल जमा झाले की कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या :

देगावच्या शिवारात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, तरुण शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला

Photo Gallery : हंगामाची सुरवात अन् शेवट सर्वकाही पाण्यातच, द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका

PM Kisan Yojna : 25 मार्चला ठरणार’त्या’शेतकऱ्यांच्या योजनेचे भवितव्य, 31 मार्चला चित्र स्पष्ट

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार