AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देगावच्या शिवारात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, तरुण शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला

सर्वोच्च न्यायालयाने नियम-अटींसह बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यापासून आता गाव शिवारात पटचे आयोजन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली बंदी उठल्यामुळे या बैलगाडी शर्यतीमध्ये अनेक बैलजोड्यांचा सहभाग होत आहे. अशीच बैलगाडी शर्यत जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगावच्या काळ्या मातीत पार पडलेली आहे. बैलगाडी शर्यत हे निमित्त असले तरी या पटाच्या आयोजनापासून बैलजोडीला महत्व प्राप्त झाले आहे.

देगावच्या शिवारात रंगला बैलगाडी शर्यतीचा थरार, तरुण शेतकऱ्यांचा उत्साह शिघेला
अकोला जिल्ह्यामध्ये पार पडलेल्या बैलगाडी शर्यतीमधील एक थरार
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 11:16 AM
Share

अकोला : (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाने नियम-अटींसह (Bullock cart race) बैलगाडी शर्यतीला परवानगी दिल्यापासून आता गाव शिवारात पटचे आयोजन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली बंदी उठल्यामुळे या बैलगाडी शर्यतीमध्ये अनेक (Bull pair) बैलजोड्यांचा सहभाग होत आहे. अशीच बैलगाडी शर्यत जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील देगावच्या काळ्या मातीत पार पडलेली आहे. बैलगाडी शर्यत हे निमित्त असले तरी या पटाच्या आयोजनापासून बैलजोडीला महत्व प्राप्त झाले आहे. आठवडी बाजारात बैलाच्या किंमती वाढल्या असून यामधून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. विशेषत: खिलार जोडीला अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. देगाव येथे पार पडलेल्या शर्यतीमध्ये नियमांचे पालन करण्यात आले होते तर 100 मीटर अंतर 6 सेकंदात पार करुन 58 पॉईंट घेत माकणी येथील बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावला.

गावखेड्यामध्ये पुन्ही उत्साह

गेल्या काही वर्षांमध्ये बैलगाड्या शर्यती ह्या पार पडल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळी आणि इतर वेळी जे पट भरत होते ते बंद झाले होते. पण काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नियम-अटींसह याला परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात आहे. शिवाय यामध्ये सहभागी होणाऱ्या बैलजोडींची संख्याही वाढील आहे. पटाच्या ठिकाणी तरुण शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलांची पाहणी आणि त्यामधून व्यवहारही वाढू लागले आहेत. एकंदरीत कोरोनामुळे आलेली मरगळ आता कुठे दूर होत असल्याचे चित्र आहे.

पाटलांच्या बैलजोडीने पटकावला क्रमांक

अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यातील देगाव या गावात बरविण्यात आला असून यात माणकी येथील बैल जोडीने 100 मिटर अंतर 6 सेकंद 58 पॉईंट मध्ये पार करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा व जिल्हा बाहेरील बैल जोड्यांचा सहभाग होता. शो पल्याच्या 32 आणि जनरल गटाच्या 19 जोड्या आल्या होत्या यात जनरल गटातून जिल्हातल्या माणकी येथील ज्ञानू पाटील मैसने या जोडीने पहिला नंबर पटकावला असून त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

खिलार जोडीच्या मागणीत वाढ

शर्यतीसाठी विशेष करुन खिलार जोडीला अधिकची मागणी असते. मध्यंतरी बैलगाडी शर्यंत बंद आणि कोरोनामुळे आठवडी बाजारही बंद यामुळे खिलार बैलाचा बाजार उठलाच होता. शिवाय भविष्यात सर्वकाही सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. मात्र, नियम-अटीसह मान्यता मिळाल्याने बैलगाड्या शर्यती ह्या पार पडत आहेत. शिवाय हजरोत असलेले बैलजोडीचे भाव आता लाखोंमध्ये आहेत.

संबंधित बातम्या :

Photo Gallery : हंगामाची सुरवात अन् शेवट सर्वकाही पाण्यातच, द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका

PM Kisan Yojna : 25 मार्चला ठरणार’त्या’शेतकऱ्यांच्या योजनेचे भवितव्य, 31 मार्चला चित्र स्पष्ट

निफाड परिसरात रिमझिम पाऊस, वातावरणात पसरला गारवा; अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता

'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.