AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli : नुकसान महाराष्ट्रातील पिकांचे, भरपाईची मागणी तेलंगणा सरकारकडे, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर

मेडीगट्टा धरणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अशीच स्थिती आहे. शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले तर पूरस्थितीमुळे शेत जमिनही खरडून गेली आहे. तेलंगणा सरकारमुळेच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

Gadchiroli : नुकसान महाराष्ट्रातील पिकांचे, भरपाईची मागणी तेलंगणा सरकारकडे, नेमकी भानगड काय? वाचा सविस्तर
मेडीगट्टा धरणामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करीत तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलेImage Credit source: TV9 Marathi
Reporter Mohmmad Hussain Khan
Reporter Mohmmad Hussain Khan | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 23, 2022 | 10:50 PM
Share

गडचिरोली :  (Kharif Season) खरीप हंगामातील पिके ही पावसावरच अवलंबून असतात. पर्जन्यमान सरासरीएवढे झाले तर उत्पादनात वाढ होते. यंदा मात्र हाच पाऊस नुकसानीचा ठरत आहे. सरासरीपेक्षा अधिकच्या पावसामुळे तर राज्यातील बहुतांश (Dam Water Level) धरणे ही भरलेली आहेत. मेडीगट्टा धरणाची तर गोष्टच न्यारी झाली आहे. गेल्या 40 गडचिरोलीत जी पूरस्थिती निर्माण झाली नव्हती ती यंदा झाली आहे. मेडीगट्टा धरणात तेलंगणातून येणाऱ्या पाण्याची आवक आहे. तेलंगणा सरकारने पाण्याचे योग्य नियोजन न केल्यानेच ही स्थिती ओढावत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गडचिरोलीतील (Crop Damage) पीक नुकसानीसाठी हे धरणच कारणीभूत ठरले असून नुकसान झालेले शेतीचे मदत महाराष्ट्र शासनाने द्यावी व भूसंपादनाची मदत तेलंगाना सरकारने द्यावी अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत.

तेलंगणा सरकारविरोधात घोषणाबाजी

मेडीगट्टा धरणामुळेच गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिन्याभरापासून अशीच स्थिती आहे. शेत शिवारात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले तर पूरस्थितीमुळे शेत जमिनही खरडून गेली आहे. तेलंगणा सरकारमुळेच ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे गडचिरोलीतील शेतकऱ्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना यंदा खरिपात दुहेरी फटका बसलेला आहे. दरवर्षी मेडीगट्टा धरणामुळे नुकसान हे ठरलेलेच असते पण यंदा नुकसानीची तीव्रता वाढलेली आहे.

खरिपातील पिके गेली वाहून

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिके वाहून गेली आहेत. शेत शिवारात पाणी साचल्याने नुकसान तर झालेच पण धरणातील पाणी शेतामध्ये घुसल्याने पिकांसह जमिनही खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची देखील संधी मिळाली नाही. गडचिरोलीसह या भागात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून खरिपावर धोक्याची घंटा होती ती ऑगस्टच्या अंतिम टप्प्यातही कायम राहिलेली आहे. त्यामुळे खरीप पाण्यात अशीच स्थिती विदर्भात ओढावलेली आहे.

तहसील कार्यालयासमोर आंदोलन

धरणातील पाणी थांबवले तरी 20 गावे पाण्याखाली येतात आणि पाण्याचा विसर्ग केला तर 22 गावे पाण्याखाली येणार अशी गंभीर परिस्थिती मेडीगट्टा धरणामुळे निर्माण झाली होती. चाळीस वर्षात एवढा मोठा पूर कधी आलेला नाही मेडीगट्टा धरणामुळेच पुराचा फटका बसला आहे. नुकसान झालेले शेतीचे मदत महाराष्ट्र शासनाने द्यावी व भूसंपादनाची मदत तेलंगाना सरकारने द्यावी ही मागणी घेऊन अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?