Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!

| Updated on: Apr 21, 2022 | 10:03 AM

वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झाला आहे. फळधारणेचा हंगाम सुरु होताच त्याला लागूनच अवकाळी पावसालाही सुरवात झाली होती. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष आणि कोकणामध्ये आंब्याच्या संपूर्ण हंगामावर अवकाळी पावसाचा प्रभाव हा दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे फळबागा जोपसण्यात अधिकचा खर्च तर झाला पण एवढे करुन शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे.

Mango : ज्याची भीती तेच झाले, आंब्याची मागणी वाढली उत्पादन घटलं हे सर्व वातावरणातील बदलाने घडलं..!
आंब्याची मागणी वाढली अन् उत्पादन घटलं अशी अवस्था झाली आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : (Climate Change) वातावरणातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झाला आहे. फळधारणेचा हंगाम सुरु होताच त्याला लागूनच अवकाळी पावसालाही सुरवात झाली होती. उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष आणि कोकणामध्ये (Mango Season) आंब्याच्या संपूर्ण हंगामावर अवकाळी पावसाचा प्रभाव हा दिसून येत आहे. वातावरणातील बदलामुळे फळबागा जोपसण्यात अधिकचा खर्च तर झाला पण एवढे करुन शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. सध्या (Mango Production) आंब्याच्या मागणीत वाढ होत आहे पण उत्पादनच घटल्याने आंबा येणार तरी कोठून असा सवाल आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ 30 टक्के आंबा उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले असल्याचे आंबा उत्पादक संघाने सांगितले आहे. शिवाय तिसऱ्या टप्प्यातील आंबा हा एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात येणार होता मात्र, वाढत्या उन्हामुळे त्या आशा देखील धुसर झाल्या आहेत. त्यामुळे हंगामाच्या सुरवातीला जी भीती व्यक्त केली जात होती अखेर तसेच आंबा उत्पादकांच्या बाबतीत झाले आहे.

मागणी वाढूनही दर मात्र स्थिरच

रत्नागिरीसह मुख्य बाजारपेठेत आंब्याची आवकच झालेली नाही. हंगामाच्या सुरवातीच्या काळात वाशी, मुंबई, पुणे येथील बाजारपेठेमध्ये आंबा दाखल झाला होता. त्यानंतर मात्र, मागणी वाढली अन् उत्पादन घटले अशी अवस्था झाल्याने अनेकांना यंदा आंब्याची चव तरी चाखायला मिळते की नाही अशी परस्थिती आहे. मागणी वाढली तरी पाऊस आणि उन्हामुळे आंब्याचा दर्जा हा ढासाळलेला आहे. त्यामुळे दर हे स्थिर आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा हा संपला असून मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नाही.

700 ते 1000 रुपयाला आंब्याची पेटी

मागणी वाढूनही त्याचा परिणाम मात्र दर वाढीवर झाला नाही हे विशेष. सध्या मार्केटमध्ये आंब्याची एक पेटी 700 ते 1000 रुपयांना मिळत आहे. मध्यंतरी हंगामाला सुरवात होताच याच पेटीचे दर 1 हजार 500 ते 2 हजारापर्यंत होते. वातावरणातील बदलामुळे आंब्याच्या दर्जावर परिणाम झाला होता. शिवाय अशा आंब्याची शेतकरी साठवणूकही करु शकत नाही. त्यामुळे मिळेल तो दर पदरात पाडून घेतला जात आहे. यंदा द्राक्ष उत्पादक आणि आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे मात्र, न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातीलही आशा धुसर

केवळ अवकाळीच नाही तर थंडी आणि वाढत्या उन्हाचा देखील परिणाम आंबा उत्पादनावर झालेला आहे. हंगाम लांबल्याने अखेरच्या टप्प्यातील आंबा हा एप्रिल महिन्याच्या अंतिम टप्प्यात बाजारात दाखल होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, मध्यंतरीची अवकाळी आणि आताचे ऊन यामुळे उत्पादनच शेतकऱ्यांच्या पदरी पडते की नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे वातावराणातील बदलामुळे संपूर्ण हंगामच हातचा गेल्याची शेतकऱ्यांची भावना झाली आहे.

संबंधित बातम्या :

Unseasonable Rain: द्राक्षानंतर कांदा नुकसानीने डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला! देवळा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Wheat Rate : गव्हाच्या वाढीव दराला खेडा खरेदीमुळे ‘ब्रेक’, व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Central Government : ‘ड्रोन’ शेतीला अखेर ग्रीन सिग्नल, काय असणार अटी-नियम? वाचा सविस्तर