AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो ‘ई-केवायसी’ची मुदत वाढली, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा 12 व्या हप्त्याला मुकावे लागणार..?

'पीएम किसान योजना' ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. गेल्या 4 वर्षापासून योजनेमध्ये सातत्य राहिले असून देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. असे असताना मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. लाखो शेतकरी असे आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत पण त्यांच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो 'ई-केवायसी'ची मुदत वाढली, प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा 12 व्या हप्त्याला मुकावे लागणार..?
पीएम किसानImage Credit source: tv9
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Jun 23, 2022 | 3:06 PM
Share

मुंबई :  (PM Kisan Scheme) पीएम किसान योजनेचा आता 12 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. 2018 साली सुरु झालेल्या या योजनेमध्ये सातत्य राहिलेले आहे. 1 जून रोजी 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर आता 12 हप्त्यासाठी शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना (E-KYC) ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याकरीता केंद्र सरकारने मुदत वाढवली असून आता 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांची संख्या पाहता ही वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता एका महिन्यामध्ये ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावे लागणार आहे. स्थानिक पातळीवर (Farmer) शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, शेतकऱ्यांची वाढती संख्या यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे योजनेत नियमितता आणण्याचा हा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

ई-केवायसी नेमके कशासाठी ?

‘पीएम किसान योजना’ ही केंद्र सरकारची महत्वाची योजना आहे. गेल्या 4 वर्षापासून योजनेमध्ये सातत्य राहिले असून देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. असे असताना मात्र काही अपात्र शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला आहे. लाखो शेतकरी असे आहेत जे या योजनेसाठी पात्र नाहीत पण त्यांच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत. केंद्राच्या या योजनेत तत्परता येण्यासाठी ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकिय नौकरदार, कर अदा करणारे शेतकरी, आमदार, खासदार, महापौर, जिल्हा परिषद सदस्य तसेच घटनात्मक पदावर असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. अटी-नियमांचे उल्लंघन करुनही अनेकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडू आता वसुलीची प्रक्रिया सुरु आहे.

*अशी आहे eKYC करण्याची सोपी पध्दत

eKYC – म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

*आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसी ला क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जाऊन कागद पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे

*आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे? फार्मर कॉर्नर वरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत. त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे तोच येथे टाकायचा आहे…त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे. यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!