Egg Price : अंड्याच्या दरात मोठी घसरण, कुक्कुटपालन व्यवसायच अडचणीत

| Updated on: May 24, 2022 | 4:37 PM

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा कमी झाल्या आहेत. दिल्लीतील एनसीआर घाऊक बाजारात किंमतीतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही अंड्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत अंड्यांच्या किंमतीत शेकडामागे सरासरी 30-50 रुपयांची घट झाली आहे.

Egg Price : अंड्याच्या दरात मोठी घसरण, कुक्कुटपालन व्यवसायच अडचणीत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकीकडे (Agricultural goods) शेतीमालाच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे शेतीशी संबंधित असलेले (Joint business) जोड व्यवसायही अडचणीत येत आहेत. (Egg Rate) अंड्याच्या दरातील चढ-उतार या महिन्यात अधिक प्रमाणात जाणवला आहे. महिन्याभरात सलग दुसऱ्या वेळी अंड्याच्या दरात घसरण झाली आहे. ठोक बाजारात तर प्रति शेकडा 50 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे ‘संडे हो या मंडे’ ही म्हण आता उत्पादकांसाठी चांगलीच अडचणीची ठरत आहे. मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने ही स्थिती ओढावली आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. घाऊक बाजारपेठेत 20 टक्क्यांनी दर घसरले आहेत. गेल्या 15 दिवसांमध्ये तर अंड्याचे दर सर्वात खालच्या स्तरावर आले आहेत.

प्रति शेकडा 50 रुपयांची घट

केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही दरात घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात अंड्याच्या किंमती सलग दोन वेळा कमी झाल्या आहेत. दिल्लीतील एनसीआर घाऊक बाजारात किंमतीतील सर्वात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, यूपी, बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही अंड्यांच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांत अंड्यांच्या किंमतीत शेकडामागे सरासरी 30-50 रुपयांची घट झाली आहे. नॅशनल एग कॉर्प्स ऑर्डनेश कमिटीच्या अहवालानुसार बिहारमध्ये मध्यंतरी अंड्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. चालू महिन्यात तीन वेळा अंड्याचे दर बदलले आहेत. सुरवातीला 380 रुपये शेकडा असे दर होते तर मध्यंतरी 500 रुपये शेकडा अशी वाढ झाली होती तर आता दोन दिवसांमध्ये शेकड्यामागे 20 ते 40 रुपायांची घसरण झाली आहे.

देशात सर्वाधिक दर कोलकत्यामध्ये

अंड्याच्या दरात चढ-उतार होत असला तरी केवळ कोलकत्यामध्ये दरात मोठी वाढ झाली तर पुन्हा घट झाल्याचे समोर आले आहे. चालू महिन्यात येथे अंड्याचे दर हे 535 रुपये शेकड्यावर गेले होते. जे इतर राज्याच्या तुलनेत चांगले होते. एनईसीसीच्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक अंड्यांची किंमत या महिन्यात कोलकात्यात पोहोचली, मात्र सोमवारी ती 55 रुपयांनी घसरले आहेत. मागणीत घट झाल्याने दरात चढ-उतार होत असल्याचे सांगितले जात आहे. पण याचा सर्वाधिक परिणाम हा लहान व्यावसायिकांवर होत आहे.

हे सुद्धा वाचा

उत्पादनावरील खर्च काढणेही मुश्किल

अंड्याच्या दरात घट झाल्याने वर्षभर झालेला खर्च काढणेही मुश्किल झाले आहे. सध्या एका अंड्याची किंमत ही 4.25 ते 4.50 एवढी आहे. यापेक्षा कमी दरात विक्री करण्याची नामुष्की ओढावली तर झालेला खर्चही निघणे मुश्किल होणार आहे. तर दुसरीकडे व्यवसायातील स्पर्धेतून ही घसरण झाली असल्याचे उत्तर प्रदेश पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली अकबर यांनी सांगितले आहे. व्यावसायिकांना योग्य दर मिळावा म्हणून संघटना योग्य ती पावले उचलत अहे. लवकरच दरात सुधारणा होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.