सांगलीच्या शेतकऱ्यांना अच्छे दिन; हळदीला आला सोन्याचा भाव

| Updated on: Mar 08, 2021 | 7:28 AM

स्थानिक हळदीची आवक वाढत आहे आणि हळदीला आता उच्चांकी दर मिळू लागलेले आहेत. | Turmeric crop

सांगलीच्या शेतकऱ्यांना अच्छे दिन; हळदीला आला सोन्याचा भाव
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतलं जाते. यामध्ये राजापुरी हळदीचे पीक हे प्रसिद्ध आहे
Follow us on

सांगली: गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर वाढत असल्याने सांगलीतील शेतकऱ्यांना (Farmers) अच्छे दिन आल्याचे चित्र आहे. स्थानिक हळदीची आवक वाढत आहे आणि हळदीला आता उच्चांकी दर मिळू लागलेले आहेत. आष्टा या ठिकाणी बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या हळदीच्या सौद्यात हळदीला 31 हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला आहे. (Turmeric crop get highest bidding in auction)

जागतिक हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये देशातल्या अनेक राज्यातून हळद विक्रीसाठी दाखल होत असते. त्याचबरोबर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतलं जाते. यामध्ये राजापुरी हळदीचे पीक हे प्रसिद्ध आहे.वाळवा तालुक्यात हळदीचा मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सांगलीच्या मार्केट यार्ड बरोबर इस्लामपूर बाजार समितीचे उपबाजार असणाऱ्या आष्टा येथील विलासराव शिंदे हळद मार्केट याठिकाणी हळदीचे सौदे पार पडतात.

गेल्या आठवड्यात शनिवारी या बाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सौद्यात हळदीला उच्चांकी असा दर मिळाला आहे. तब्बल 31 हजार रुपये इतका दर राजापुरी हळदीला मिळाला आहे. मिरजवाडी येथील बिपिन खोत या शेतकरयाच्या हळदीला हा उच्चांकी दर मिळाला आहे. या सौदयात सुमारे 2 हजार 100 पोत्यांची आवक झाली होती, अशी माहिती इस्लामपूर कृषी बाजार समितीचे सभापती अल्लाऊद्दीन चौगुले यांनी दिली.

कर्नाटकमध्येही हळदीला सोन्याचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारपेठेत हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या हळदीला 30 हजार क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला होता. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जंगली झेंडूच्या लागवडीतून दुप्पट उत्पन्न, सुगंधी तेल काढून शेतकऱ्यांची अतिरिक्त कमाई

गहू, धान, मका, डाळी या पारंपारिक पिकांव्यतिरिक्त आपले उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन पर्याय शोधणे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील शेतक्यांनीही असेच काही केले आहे. येथे वन्य झेंडूच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळाले आहे. शेतकर्‍यांनी वन्य झेंडू (Tagetes Minuta) च्या वनस्पतींमधून सुगंधी तेल काढत आहेत.

संबंधित बातम्या:

Video | नांदेडच्या युवा शेतकऱ्यांनी करुन दाखवलं, जिरेनियम शेतीद्वारे लाखोंची कमाई

अबब! मुंबईत हापूस आंब्याची 5 डझनची पेटी 1 लाख रुपयांना विकली

चंदनाची शेती करा, लाखात नाही कोटीत कमवा; विदर्भ, मराठवाड्यासाठी वरदान? वाचा स्पेशल रिपोर्ट

(Turmeric crop get highest bidding in auction)