Nashik : कांद्या वांदा अखेर रस्त्यावर, कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन

| Updated on: May 19, 2022 | 12:57 PM

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादकांना मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण देखील वाढले आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किमान 1 हजार 500 ते 2 हजार सरकारने आधारभूत किमतीला खरेदी करावा तसेच विकलेल्या कांद्याला क्विंटल मागे 500 अनुदान द्यावे अशा मागण्या शेतकरी आणि प्रहारच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Nashik : कांद्या वांदा अखेर रस्त्यावर, कवडीमोल दरामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन
कांद्याच्या घटत्या दरावरुन नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रास्तारोको केला होता.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगांव : गेल्या काही दिवसांपासून (Onion Rate) कांद्याच्या दरावरुन शेतकरी किंवा शेतकरी संघटना ह्या आक्रमक भूमिका घेतील असेच चित्र नाशकात झाले होते. कांदा उत्पादकांची संख्या, वाढलेले क्षेत्र आणि बाजारपेठेत घटलेले दर यामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यामुळे कांद्याच्या दराचा वांदा मिटवण्यासाठीच (Nashik District) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्य मार्गावरच रास्तारोको करुन रोष व्यक्त केला आहे. (Summer Season) उन्हाळी हंगामातील कांदा बाजारपेठेत दाखल झाल्यापासून दरत घसरण ही सुरुच होती. काही भागांमध्ये तर शेतकऱ्यांनी कांद्याचे फुकटात वाटप केले. कांद्याला किमान दर मिळावा, कांदा साठवूकीसाठी यंत्रणा उभारावी अशा अनेक मागण्या घेऊन रास्तारोका करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यामध्ये नाफेडच्यावतीने कांदा खरेदी सुरु असतानाच शेतकरी दराला घेऊन नाराज होते.

कांदा उत्पादकांची मागणी काय?

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे. कांदा उत्पादकांना मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रमाण देखील वाढले आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किमान 1 हजार 500 ते 2 हजार सरकारने आधारभूत किमतीला खरेदी करावा तसेच विकलेल्या कांद्याला क्विंटल मागे 500 अनुदान द्यावे अशा मागण्या शेतकरी आणि प्रहारच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

‘नाफेड’ च्या खरेदीमध्ये अनियमितता

सध्या राज्यातील मुख्य बाजारपेठेतून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरु आहे. भविष्यात कांद्याचे दर वाढले तर हा नाफेड कडील कांदा हा बाजारपेठेत आणून दर नियंत्रित केले जातात. मात्र, सध्या जी नाफेडकडून खरेदी केली जात आहे त्यामध्ये देखील अनियमितता आहे. त्यामुळे सर्व देशभरात नाफेडने एकाच किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

हे सुद्धा वाचा

कांद्याच्या दरात घसरण

दिवसेंदिवस कांदा दरात घसरण ही सुरुच आहे. उन्हाळी कांदा मार्केटमध्ये दाखल होण्यापूर्वी 30 ते 32 रुपये किलो असे दर होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुरु झालेली घसरण आता 1 ते 2 रुपये किलोंवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव आणि साठवणूकीसाठी यंत्रणा उभी करुन देण्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांदा क्षेत्र असून कांदा उत्पादकांना न्याय मिळावा अशीच मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.