Chickpea Crop : हरभरा फुलोऱ्यात, घाटीअळीचे करा असे एकात्मिक व्यवस्थापन

रब्बी हंगामातील हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. वातावरणातील बदलामुळे हऱभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मादीने पानांवर कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर कळ्यांवर अंडी घालते. त्यातून दोन, तीन दिवसांत अळी बाहेर येते. ती पानातील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात.

Chickpea Crop : हरभरा फुलोऱ्यात, घाटीअळीचे करा असे एकात्मिक व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 8:15 AM

लातूर : (Rabi season) रब्बी हंगामातील हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. (cloudy weather) वातावरणातील बदलामुळे हऱभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. मादीने पानांवर कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर कळ्यांवर अंडी घालते. त्यातून दोन, तीन दिवसांत अळी बाहेर येते. ती पानातील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. मोठ्या झालेल्या अळ्या संपूर्ण पाने व कोवळे देठ खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे फुलोऱ्यात फुले व कळ्या खाऊन नुकसान करतात. घाटयातील दाणे खातात. एक घाटे अळी साधारणतः 35 ते 40 घाट्यांचे नुकसान करते.

रब्बी हंगामात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा

यंदा शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केलेला आहे. पावसामुळे पेरण्या महिन्याभराने लांबणीवर पडल्या होत्या. त्यामुळे ज्वारी ऐवजी शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीच्या अनुशंगाने कडधान्यावर भर दिला होता. पेरणी होताच पोषक वातावरणामुळे पिकांची वाढ तर जोमात झाली पण आता अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगराई वाढत आहे. त्यामुळे वेळेतच योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हरभरा पेरणीकरिता पोषक वातावरण असल्याने कृषी विभागाकडूनही हरभरा लागवडीवरच भर देण्याचे आवाहन करण्यात आले होते. एवढेच नाही तर कृषी विद्यापीठाकडून सवलतीच्या दरात हरभरा बियाणाचेच वाटप करण्यात आले होते. आता घाटी आळीचे योग्य व्यवस्थापन करुनच शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा उद्देश साध्य करता येणार आहे.

घाटे अळी एकात्मिक व्यवस्थापन

‘T’ आकाराचे पक्षिथांबे हेक्टरी 20 प्रमाणात उभारावे लागणार आहेत. त्यामुळे पक्षीभक्षक शेतातील अळ्या वेचून खातात. शेतात हेलील्युर वापरून हेक्टरी पाच कामगंध सापळे पिकापासून एक फूट उंचीच्या अंतरावर उभे करावे लागणार आहेत. त्यात सलग तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास नियंत्रणाचे उपाय करावे लागणार आहेत.

फवारणी प्रति लिटर पाणी

पहिली फवारणी पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना, निंबोळी अर्क, ॲझाडिरॅक्टिन 5 मि.लि प्रति लिटर, एचएएनपीव्ही 500 एलई हे किंवा 1 मिलि प्रति लिटर किंवा क्विनॉलफॉस 2 मि.लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे तर अशाच पध्दतीने दुसरी फवारणी इमामेक्टीन बेंझोएट 0.3 ग्रॅम किंवा क्लोरॅण्ट्रानिलिप्रोल 0.25 मिलि, फ्ल्यूबेंडायअमाइड 0.5 मिलि किंवा बिव्हेरिया बॅसियाना 6 ग्रॅम याचे मिश्रण 1 लिटर पाण्यात मिसळून ही 15 दिवसाच्या अंतराने करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

संकट कायम : आता कुठे लागला होता आंब्याला मोहर त्यात पुन्हा झाला अवकाळीचा कहर

मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?