मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?

जिल्ह्यातील मांजरा नदीकाठच्या परिसरात बांबू लागवडीचा उपक्रम सध्या जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. त्याच अनुशंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी पोहचले होते औसा तालुक्यातील सलगरा येथे. या ठिकाणी बांबू लागवडीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला पण मांजरा नदी पलीकडच्या तोंडाळी (ता. औसा) गावात जाण्यासाठी जवळचा रस्ताच नव्हता.

मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?
लातूर जिल्ह्यात बांबू लागवड मोहीमेला सुरवात झाली आहे. त्या दरम्यान मांजरा नदीकाठच्या गावाला जाण्यासाठी जवळचा रस्ता नसल्याने जिल्हाधिकारी यांना कल्हईून प्रवास करावा लागला
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 3:18 PM

लातूर : (Latur) जिल्ह्यात ना पाऊस आहे ना कोणती नैसर्गिक आपत्ती. असे असताना कल्हईतून प्रवास तो ही जिल्हाधिकाऱ्यांना असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे वास्तव आहे. त्याचे झाले असे जिल्ह्यातील (Manjra River) मांजरा नदीकाठच्या परिसरात बांबू लागवडीचा उपक्रम सध्या जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. त्याच अनुशंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी पोहचले होते औसा तालुक्यातील सलगरा येथे. या ठिकाणी (Bamboo Cultivation Campaign) बांबू लागवडीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला पण मांजरा नदी पलीकडच्या तोंडाळी (ता. औसा) गावात जाण्यासाठी जवळचा रस्ताच नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व चमूला प्रवास करावा लागला तो कल्हईतून. निमित्त काहीही असो त्यामुळे का होईना जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना मांजरा नदीचे पात्र कल्हईतून पार करावे लागले होते.

सलगरा येथून बांबु लागवडीला सुरवात

लातूर तालुक्यातील सलगरा येथून बांबु लागवडीला शनिवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सुरवात झाली आहे. मांजरा नदीचा प्रवाह 720 किमीचा आहे तर लातूर जिल्ह्यातून 283 एवढ्या किमीचा प्रवास आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंना बांबुची लागवड केली जाणार आहे. त्यामुळे जमिनीची धूप होणार नाही शिवाय शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्येही भर पडणार आहे. या प्रकल्पाची सुरवात लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे झाली आहे. यावेळी 40 शेतकऱ्यांनी 100 एकरावर बांबु लागवजडीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लागवडीबरोबर शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीही केली जाणार आहे.

बांबू लागवडीचा आदर्श निर्माण करणार

मध्यंतरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान, बांबू लागवडीचे आवाहन लातूरकरांना केले होते. तेव्हापासून शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या माध्यमातून बांबू लागवडीबाबत जनजागृती केली जात आहे. याच दरम्यान आता, जिल्ह्यात मांजरा नदीचा प्रवास हा 283 किमीचा आहे. त्यामुळे या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेतला तर दुहेरी फायदा होणार आहे. यामुळे शेतजमिनीची धूप होणार नाही तर पर्यावरणाचे संरक्षणही होणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना पोखरा योजनेचा लाभ घेऊन यामध्ये सहभागी होता येणार आहे.

यांनीही केला कल्हईतून प्रवास

लातूर जिल्ह्यातल्या मांजरा नदी काठावर असलेल्या सलगरा गावातून तोंडोळी या गावात जाण्यासाठी जवळचा रस्ताच नाही , त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना तोंडोळी गावात जाण्यासाठी कल्हईची मदत घ्यावी लागली. यावेळी माजी आमदार- पाशा पटेल ,जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अभिनव गोयल , कृषी अधिक्षक -दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांची उपस्थिती होती.

संबंधित बातम्या :

Grape Exports : अखेर संकटांची शर्यंत पार करीत नाशिकच्या द्राक्षांचा सातासमुद्रापार झेंडा! पहिल्याच टप्प्यात दोन देशात निर्यात

पोखरातून ‘मांजरा’चे पुनरुज्जीवन : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पर्यावरणाचा समतोलही, काय आहे उपक्रम?

Untimely Rain : अतिवृष्टीने खरिपाचे तर आता अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान, अणखीन दोन दिवस धोक्याचेच

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.