Grape Exports : अखेर संकटांची शर्यंत पार करीत नाशिकच्या द्राक्षांचा सातासमुद्रापार झेंडा! पहिल्याच टप्प्यात दोन देशात निर्यात

लागवडीपासून काढणीपर्यंत द्राक्ष बागांची जोपासना ही तळहाताच्या फोडाप्रमाणे करावी लागते. योग्य पाण्याचे आणि औषधाची मात्रा दिली तरच हे पीक पदरात पडते. यंदा तर 15 दिवसांतून एकदा अवकाळी ही ठरलेलीच. असे असतानाही अनंत संकटाचा सामना करीत नाशिक मुख्य आगारातून द्राक्ष निर्यातीस सुरवात झाली आहे. परकीय चलनाच्या अनुशंगाने द्राक्ष बागायतदारांसाठी हे खूप महत्वाचे मानले जाते.

Grape Exports : अखेर संकटांची शर्यंत पार करीत नाशिकच्या द्राक्षांचा सातासमुद्रापार झेंडा! पहिल्याच टप्प्यात दोन देशात निर्यात
प्रतिकूल परस्थितीमधूनही यंदा नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात झाली आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:20 PM

नाशिक : यंदा निसर्गाची अवकृपा प्रत्येत हंगामावर आणि हंगामातील प्रत्येक पिकावर राहिलेली आहे. यामधून फळबागांचीही सुटका झालेली नाही. नाशिक जिल्हा तर (Gape Production) द्राक्ष उत्पादनासाठी महत्वाचे आगार मानला जातो. यंदा जसे द्राक्ष पीक बहरात येत होते त्यापेक्षा अधिक तुलनेने अवकाळी आणि निसर्गाच्या लहरीपणाचे संकट गडद होते. लागवडीपासून काढणीपर्यंत द्राक्ष बागांची जोपासना ही तळहाताच्या फोडाप्रमाणे करावी लागते. योग्य पाण्याचे आणि औषधाची मात्रा दिली तरच हे पीक पदरात पडते. यंदा तर 15 दिवसांतून एकदा अवकाळी ही ठरलेलीच. असे असतानाही अनंत संकटाचा सामना करीत नाशिक मुख्य आगारातून (Grape Export) द्राक्ष निर्यातीस सुरवात झाली आहे. परकीय चलनाच्या अनुशंगाने द्राक्ष बागायतदारांसाठी हे खूप महत्वाचे मानले जाते.

‘या’ दोन देशाला पहिला मान

अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या परस्थितीवर मात करुन निर्यातीसाठी द्राक्ष बागायतदार संघाने दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातून नेदरलॅंड आणि बेल्जिअम या देशामध्ये 7 कंटेनरमधून 89 मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यामुळे वर्षभर संकटात असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे. परकीय चलनातून अधिकचा नफा मिळेल या आशेने निर्यात केली जाते. मात्र, यंदा पोषक वातावरण नव्हते. तोडणीपर्यंत अवकाळी पावसाचा धोका असल्याने शेतकऱ्यांच्या मनात कायम धाकधूक होती अखेर निर्यातीला सुरवात झाली आहे.

केंद्र सरकारची भूमिका महत्वाची

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. सन 2020-21 हंगामात तब्बल 2 लाख 46 हजार 107 मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून 2 हजार 298 कोटी रुपयांहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले त्यामुळे केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठी नवनवीन बाजारपेठ शोधून आपल्याकडील शेतमाल जास्तीत जास्त कसा निर्यात होईल या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने बांगलादेश मध्ये द्राक्ष निर्यातीसाठी विशेष लक्ष देऊन कंटेनरचे वाढलेले भाडे, पॅकिंग मटेरियल, इंधन दरवाढ यामुळे निर्यात खर्चात वाढ झाली आहे. याचा विचार करत केंद्र सरकारने माल वाहतूक भाड्यात पन्नास टक्के अनुदान देण्याची मागणी होत आहे.

गेल्या चार वर्षात झालेली निर्यात

साल                         निर्यात                                        रुपये 2017-18        1 लाख 88 हजार 221 मॅट्रिक टन        1 हजार 900 कोटी

2018-19        2 लाख 46 हजार 133 मॅट्रिक टन        2 हजार 335 कोटी

2019-20       1 लाख 93 हजार 690 मॅट्रिक टन       2 हजार 177 कोटी

2020-21       2 लाख 46 हजार 107 मॅट्रिक टन       2 हजार 298 कोटी

संबंधित बातम्या :

पोखरातून ‘मांजरा’चे पुनरुज्जीवन : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ अन् पर्यावरणाचा समतोलही, काय आहे उपक्रम?

Untimely Rain : अतिवृष्टीने खरिपाचे तर आता अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान, अणखीन दोन दिवस धोक्याचेच

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.