Untimely Rain : अतिवृष्टीने खरिपाचे तर आता अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान, अणखीन दोन दिवस धोक्याचेच

गेल्या वर्षभरापासून हवामान विभागाचे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरत आहेत. गतवर्षी खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुनारवृत्ती आता रब्बी हंगामात होत आहे. पेरणी होऊन महिना उलटला असून हरभरा, गहू, सुर्यफूल ही पाके जोमात असतानाच पुन्हा अवकाळी आणि गारपिटीच्या तडाक्यात रब्बी पीके सापडलेली आहेत.

Untimely Rain : अतिवृष्टीने खरिपाचे तर आता अवकाळीने रब्बी पिकांचे नुकसान, अणखीन दोन दिवस धोक्याचेच
अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे

अमरावती : गेल्या वर्षभरापासून (Meteorological Department) हवामान विभागाचे अंदाज अगदी तंतोतंत खरे ठरत आहेत. गतवर्षी खरीप हंगामातील पिके जोमात असतानाच झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, मुग पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती आता (Rabi Season) रब्बी हंगामात होत आहे. पेरणी होऊन महिना उलटला असून हरभरा, गहू, सुर्यफूल ही पाके जोमात असतानाच पुन्हा (Untimely Rain) अवकाळी आणि गारपिटीच्या तडाक्यात रब्बी पीके सापडलेली आहेत. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच आहे. पण खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन काढण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार यशस्वी होतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

काढणीला आलेली तूरही पाण्यातच

खरीप हंगामातील तुरीवर केवळ अतिवृष्टीचा परिणाम झालेला नव्हता. मात्र, आता हे पीक अंतिम टप्प्यात असताना सातत्याने अवकाळी पाऊस आणि त्यानंतर ढगाळ वातावरण यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. तूर अंतिम टप्प्यात आहे. वातावरणातील बदलामुळे या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यानंतर योग्य ती काळजी घेत शेतकऱ्यांनी हे पीक जोपासले शिवाय काही ठिकाणी काढणीची कामेही सुरु झाली होती. मात्र, शनिवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीमुळे तुरीचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

रब्बी जोमात मात्र, रात्रीतून पीके कोमात

पेरणीपासून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सुर्यफूल ही पीके पोषक वातावरणामुळे वाढीस लागली होती. शिवाय मशागतीची कामेही झाल्याने पीके बहरून उत्पादनात वाढ होईल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अवकाळी पावासाचे संकट यंदा कायमच आहे की काय अशी स्थिती आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती आता महिन्याभरानंतर पुन्हा तेच संकट ओढावल्याने शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी व गारपिटमुळे झालेल्या पिकांची पाहणी करुन पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या शाळेवरील पत्रे भुर्रर्र

अवकाळी पावसामुळे केवळ शेती पिकाचेच नुकसान झाले असे नाही तर नागरिकांची तारांबळही उडाली. आता वाफसा नसल्याने शेती कामे खोळंबली आहेत. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे नेरपिंगळाई येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवरील तीन पत्रेही उडून गेले. पावसामुळे मोर्शी व चांदुरबाजार तालुक्यातील संत्रा,कापूस, तूर, हरभरा सह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या :

कामगार आयुक्तांचा नवा निर्णय, वाहतूकदारांकडून स्वागत- शेतकऱ्यांवर मात्र आर्थिक भार, वाचा सविस्तर

शेतकऱ्यांच्या लोकवर्गणीतून सुरु झालेला लढा आता मालमत्ता जप्तीपर्यंत, मराठवाड्यातील 20 कारखान्यांची काय आहे कहाणी?

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी जमिनीची सुपिकता आहे महत्वाची, अशी घ्या शेतजमिनीचे काळजी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI