शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही

स्थानिक बाजारपेठेतच भेंडीचे दर वाढले असे नाही तर चांगल्या प्रतीच्या भेंडीला सातासमुद्रापलिकडेही तेवढेच महत्व आहे. आहो खरंच शिंदखेड तालुक्यातील दोन गावच्या 37 शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. विचारांची देवाण-घेवाण, बाजारपेठ आणि भाजीपाल्याची योग्या जोपासना केल्यामुळे या गावच्या शेतकऱ्यांनी अवघ्या 4 महिन्यांमध्ये लाखो रुपयांचा निव्वळ नफा मिळवलेला आहे.

शिंदखेडची भेंडी भाव खातेय लंडनच्या बाजारपेठेत, शेतकऱ्यांच्या एकजूटीचा निर्णय अन् फळही
संग्रहीत छायाचित्र

धुळे : स्थानिक बाजारपेठेतच भेंडीचे दर वाढले असे नाही तर चांगल्या प्रतीच्या भेंडीला सातासमुद्रापलिकडेही तेवढेच महत्व आहे. आहो खरंच (Dhule District) शिंदखेड तालुक्यातील दोन गावच्या 37 शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग प्रत्येक (Farmer) शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. विचारांची देवाण-घेवाण, बाजारपेठ आणि (Vegetable) भाजीपाल्याची योग्या जोपासना केल्यामुळे या गावच्या शेतकऱ्यांनी अवघ्या 4 महिन्यांमध्ये लाखो रुपयांचा निव्वळ नफा मिळवलेला आहे. याकरिता कृषी विभागाची त्यांना मदत होत असून गेल्या वर्षभरापासूनच्या प्रयत्नांचे अखेर फळ मिळाले आहे.

अशी झाली सुरवात..

शिंदखेड तालुक्यात वारुड आणि डांगुर्णे ही दोन शेजारी-शेजारी गावे आहेत. गावच्या शेतकऱ्यांचा उत्साह पाहून तालुका कृषी अधिकारी विजय बोरसे यांनी ‘ विकेल तेच पिकेल’ या योजनेच सहभागी करुन घेतले. एवढेच नाही तर या 37 शेतकऱ्यांनी 12 हेक्टरामध्ये भेंडीचेच पिक घेतले. चार महिन्याच्या या कालावधीत घ्यावयाची काळजी याबाबत कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांचे परीश्रम हे दोन्ही कामाला आले. एवढेच नाही तर भेंडी निर्यात करण्यासाठी त्यांनी मुंबई येथील एका कंपनीसोबत कृषी माध्यमातून निर्यातीचा करारही केला. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता त्यांच्या भेंडीला थेट लंडनहून मागणी आहे. त्यामुळे शिंदखेड तालुक्यातील भेंडी आता लंडनच्या बाजारात देखील भाव खात आहे.

एकरी चार टन उत्पादन

भाजीपाल्यातूनही लाखो रुपये कमवता येतात हे शिंदखेड तालुक्यातील वारुड आणि डांगुर्णे या दोन गावच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या भेंडीची सध्या तोडणी सुरु आहे. एकरी सरासरी 4 चनाचे उत्पादन होत असून भेंडीला 30 रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे. दोन्ही गावच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत खर्चा वजा जाता 70 ते 80 हजाराचा नफा झाला आहे. शिवाय अजून महिनाभर भेंडीची निर्यात होईल असे येथील शेतकरी सांगत आहेत.

हंगाम मध्यावर असाताना 750 क्विंटल भेंडीची निर्यात

आतापर्यंत 750 क्विंटल भेंडीची निर्यात या दोन गावांमधून झालेली आहे. याकरिता विकेल तेच पिकेल या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. शिवाय कृषी कार्यालयाचे मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मालाची प्रतवारीनुसार पॅकिंग आणि करार झालेल्या कंपनीच्या वाहनाद्वारे निर्यात हा कार्यक्रम गेल्या महिन्याभरासून सुरु आहे. शेतकऱ्यांची एकजूट, परिश्रम आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन यामुळे हा अनोखा प्रयोग यशस्वी झाला आहे.

संबंधित बातम्या :

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

साखर कारखान्यांच्या माध्यमातूनच ऊसतोड कामगारांचे हीत, समाजकल्याण विभागाचा काय आहे निर्णय?

संकट कायम : आता कुठे लागला होता आंब्याला मोहर त्यात पुन्हा झाला अवकाळीचा कहर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI