Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली

त्पादनवाढीसाठी शेतकऱ्याने कितीही परीश्रम आणि नियोजन केले तरी शेतीची गणिते ही निसर्गावरच अवलंबून आहेत. याचा अणखीन एक प्रत्यय म्हणजे विदर्भात होत असलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वारे. महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसामुळे खरिपासह रब्बी आणि फळबागांचे नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान भरुन निघणारे होते. शनिवारी झालेल्या अवकाळीचे नुकसान हे न भरुन निघणारे आहे.

Untimely Rain : उरली-सुरली आशा अवकाळीने मावळली, वादळी वाऱ्याने फळबागासह पीके आडवी झाली
आर्वी तालुक्यातील नांदपूरच्या रमेश जगताप यांनी तब्बल 19 एकरामध्ये केळीची बाग लावलेली होती. गारपीटीच्या तडाख्यात 19 एकरातील बाग ही उध्वस्त झाली आहे.
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 4:04 PM

वर्धा : उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्याने कितीही परीश्रम आणि नियोजन केले तरी शेतीची गणिते ही निसर्गावरच अवलंबून आहेत. याचा अणखीन एक प्रत्यय म्हणजे विदर्भात होत असलेला ( Untimely rain) अवकाळी पाऊस आणि वादळी वारे. महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसामुळे (Kharif Season) खरिपासह रब्बी आणि फळबागांचे नुकसान झाले होते. मात्र, हे नुकसान भरुन निघणारे होते. शनिवारी झालेल्या अवकाळीचे नुकसान हे न भरुन निघणारे आहे. (Fruit)  फळबागा अंतिम टप्प्यात आहेत तर खरिपातील तूरीची काढणी करुन साठा केलेला आहे. अवकाळी कमी म्हणून की यावेळी वादळीवाऱ्याने जोर धरला आहे. त्यामुळे (Wardha District) वर्धा जिल्ह्यातील केळीच्या बागा ह्या आडव्या झाल्या आहेत तर इतर सर्व पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक तडाखा आर्वी तालुक्याला बसलेला आहे.

आर्ध्या तासाच्या वादळी दीड वर्षाची मेहनत वाया

जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील नांदपूरच्या रमेश जगताप यांनी तब्बल 19 एकरामध्ये केळीची बाग लावलेली होती. आतापर्यंतही संकटे आली नाहीत असे नाही पण शनिवारचे विघ्न काही वेगळेच होते. अवकाळीने शेतजमिनीत पाणी साचले आहे तर वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग आडवी झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून बाग जोपासण्यासाठी जगताप यांचा लाखोंनी खर्च झाला आहे. गत महिन्यातच झालेल्या अवकाळीचे नुकसान आता संपुष्टात आले होते. तेवढ्यात गारपीटीच्या तडाख्यात 19 एकरातील बाग ही उध्वस्त झाली आहे. पूर्णपणे बाग आडवी झाल्याने आता हे न भरुन निघणारे नुकसान असल्याचे जगताप यांनी सांगतिले आहे.

काढणी केलेली तूर मातीमोल

मातीमोल नुकसान म्हणजे काय असते? याचा प्रत्यय कालच्या अवकाळी पावसामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला आहे. खरीप हंगामातील शेवटचे पीक असलेल्या तूरीच्या काढणीला सुरवात झाली आहे. आतापर्यंत सोयाबीन, कापूस या पिकांचे तर नुकसान झालेलेच आहे किमान तुरीमधून चार पैस मिळतील ही आशा शेतकऱ्यांना होती. पण शेतकऱ्यांचे हे स्वप्न अवघ्या आर्ध्या तासाच्या अवकाळी पावसाने उध्वस्त केले आहे. रवींद्र जगताप या शेतकऱ्याची पाच एकरातील तूर शेतकऱ्याने शेतात कापून ठेवली होती.अचानक दुपारच्या सुमारास गरपीटीचा तडाखा बसला. यात शेतकऱ्याच्या हातात आलेल्या तुरी पिकाचे नुकसान झाले. कापून ठेवलेल्या तुरीचे दाणे गरपीटमुळे शेतात खाली पडले.

एकाच तालुक्यातील 100 शेतकऱ्यांचे नुकसान

अवकाळ गाभंण काय असतं हे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना शनिवारी प्रकर्षाने जाणवले आहे. वातावरण कोरडे असताना शनिवारी दुपारी अचानाक सुरु झालेल्या पावसामुळे आर्वी तालुक्यातील नांदपूरसह लगतच्या गावची पिके जमिनदोस्त झाली होती. तूर,चणा, गहू, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दिलीप देशमुख यांच्या चार एकरात चण्याची लागवड करण्यात आली होती. याचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या :

साखर कारखान्यांच्या माध्यमातूनच ऊसतोड कामगारांचे हीत, समाजकल्याण विभागाचा काय आहे निर्णय?

संकट कायम : आता कुठे लागला होता आंब्याला मोहर त्यात पुन्हा झाला अवकाळीचा कहर

मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.