AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim : आश्वासनांची खैरात, प्रोत्साहन रकमेतून दिलासा नव्हे तर शेतकऱ्यांचे खच्चीकरण

महाविकास अघाडी सरकार सत्तेवर येताच महात्मा ज्याोतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्या दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाखापर्यंतचे कर्ज आहे त्यांचे सरसकट माफ तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे अशांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही रक्कम वर्ग करण्याचे मागे पडले तर त्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.

Washim : आश्वासनांची खैरात, प्रोत्साहन रकमेतून दिलासा नव्हे तर शेतकऱ्यांचे खच्चीकरण
उत्पादनवाढीसाठी यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: May 23, 2022 | 10:44 AM
Share

वाशिम :  (State Government) राज्य सरकारने 2 लाखापर्यंतची कर्जमाफीची घोषणा करुन अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित (Loan Waiver) कर्ज अदा केले होते त्यांना 50 हजार पर्यंतच प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण यानंतर दोन (Budget) अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले पण अजूनही 50 हजार ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही रक्कम कशा प्रकारे जमा होणार याची माहिती अधिवेशनादरम्यान दिली होती. मात्र, अंमलबजावणीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

कशामुळे रखडली होती प्रोत्साहनपर रक्कम?

महाविकास अघाडी सरकार सत्तेवर येताच महात्मा ज्याोतिराव फुले कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती. त्या दरम्यान, ज्या शेतकऱ्यांकडे अडीच लाखापर्यंतचे कर्ज आहे त्यांचे सरसकट माफ तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे अशांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही रक्कम वर्ग करण्याचे मागे पडले तर त्यानंतर राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. एवढे सर्व होऊन चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही रक्कम कशी आणि केव्हा शेतकऱ्यांना मिळणार याबाबत सर्वकाही सांगून आता 2 महिने कालावधी लोटला असला तरी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही.

काय म्हणाले होते उपमुख्यमंत्री ?

ठाकरे सरकारने सत्तेची स्थापना करताच कर्जमाफीची घोषणा केली होती. याच दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा केले आहे त्यांना देखील 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. मात्र, आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

रक्कम मिळणार पण कधी..?

थकबाकीदारांना दिलासा आणि नियमिकत कर्ज अदा करणाऱ्यांच्या पदरी निराशाच असेच काहीशे धोरण राज्य सरकारचे आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर लागलीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खत्यामध्ये जमा होईल असे चित्र निर्माण केले गेले. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी एक नया पैसाही शेतकऱ्यांच्या खत्यावर जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून पैसे मिळणार पण केव्हा असा सवाल वाशिम येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट