सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी ‘असे’ करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला

| Updated on: Oct 26, 2021 | 3:44 PM

खरीप हंगामातील एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. प्रतिकूल परस्थितीमध्येही सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. पण पावसाने सोयाबीन हे खराब झालेले आहे. त्यामुळे खराब माल साठवून अजून नुकसान करुन घेण्यापेक्षा त्याची विक्री करावी व चांगल्या मालाची साठवणूक करण्याचा सल्ला कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे.

सोयाबीनच्या घसरत्या दरात शेतकऱ्यांनी असे करावे नियोजन, कृषितज्ञांचा सल्ला
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

लातूर : गेल्या चार दिवसांपासून सोयाबीन (Soyabean prices) दरात वाढ तर सोडाच दर स्थिरही नाहीत उलट दरात दिवसागणिक घसरण सुरु झाली आहे. ऐन रब्बीचा (Rabbi Season) हंगामात शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असताना दर घसरत असल्याने मराठवाड्यातील शेतकरी दुहेरी संकटाला सामोरा जात आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचे योग्य नियोजन केले तर फायद्याचे राहणार आहे. सोयाबीनची मळणी झालेली आहे. त्यामुळे साहजिकच आवक ही वाढलेली आहे. तर दुसरीकडे दर हे घसरत आहेत.

त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे. शेतकऱ्यांच्या या मनातील प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी. खरीप हंगामातील एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. प्रतिकूल परस्थितीमध्येही सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. पण पावसाने सोयाबीन हे खराब झालेले आहे. त्यामुळे खराब माल साठवून अजून नुकसान करुन घेण्यापेक्षा त्याची विक्री करावी व चांगल्या मालाची साठवणूक करण्याचा सल्ला कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे.

लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये(Latur market prices)  14 ते 15 हजार क्विंटल सोयाबीनची आवक सुरु झाली आहे. सोयाबीनची काढणी-मळणी झाल्याने बीड, उस्मानाबाद, आंबाजोगाई, कर्नाटक या भागातून आवक वाढलेली आहे. मात्र, सोयाबीनला दर हा 4800 चा मिळत आहे. त्यामुळे उत्पादनावर झालेला खर्चही पदरी पडत नसल्याने सोयाबीनची साठवणूक करावी की यापेक्षा दर कमी होतील म्हणून विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र, पावसाने खराब झालेल्या मालाची साठवणूक केली तर तो अधिक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात खराब सोयाबीनची विक्री ही शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार आहे. तर चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक केली तर भविष्यात दर वाढले तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे,

डागाळलेल्या सोयाबीनची आवक बाजारात जास्त

सोयाबीनची काढणी-मळणी कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागलेला आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीनची बाजारपेठेतील आवक ही वाढलेली आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यामध्ये अधिकतर सोयाबीन हे डागाळलेले होते. पावसाने सोयाबीनची खराबी झालेली आहे. त्यामुळे साठवणूक करुनही याचा फायदा नसल्याने शेतकरी विक्रीला आणत आहेत. तर बाजारात मालाच्या दर्जाप्रमाणे दर मिळत आहे. मंगळवारी सोयाबीनला सरासरी 4 हजार 800 चा दर मिळाला आहे.

सोयाबीनची साठवणूक फायद्याची

सध्या सोयाबीनचे दर खालावले त्यामुळे डागाळलेल्या सोयाबीनची विक्री केली तरी चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक शेतकरी करु शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आताच पैशाची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास हरकत नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक आग्रवाल यांनी दिला आहे. चांगले सोयाबीन साठवणूक करुन ठेवले तरी त्याला धोका निर्माण होत नाही. शिवाय शेतीमाल तारण योजनेचाही शेतकरी फायदा घेऊ शकतात.

मळणीनंतर वाळवण गरजेचे

पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी करुन ठेवल्या होत्या. आता पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेकांनी सोयाबीनची मळणी केली आहे. मात्र, मळणी केले की साठवूण न ठेवता सोयाबीन वाळवणे आवश्यक आहे. त्यामुळे हवेचे प्रमाण हे कमी होते. आर्द्रतेचे प्रमाण हे 10 ते 12 वर आल्यावरच सोयाबीन साठवून ठेवणे आवश्यक आहे. सध्या ऊनही कडक असल्याने दोन दिवस वाळवले तरी भविष्यात सोय़ाबीनला बुरशी लागणार नाही.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6000 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5850 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5900 रुपये क्विंटल, जानकी चना 4950 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4850, सोयाबीन 5051, चमकी मूग 7150, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7199 एवढा राहिला होता. (Farmers should study market prices as soyabean prices fall, advises agriculture experts)

संबंधित बातम्या :

शेतीसाठी पाणी हवंय, मग ‘ही’ प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

पूर्वसूचना करुनही पंचनामे प्रलंबित, शेतकऱ्यांनो ‘ही’ काळजी घ्या तरच मिळेल नुकसानभरपाई

पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ