AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीसाठी पाणी हवंय, मग ‘ही’ प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर या तालुक्यांतील जलाशय, नदीनाले, कालवा या लघु प्रकल्पांमधून प्रवाही, उपसा व ठिबक सिंचन पद्धतीने रब्बी हंगाम 2021-22 करिता पाण्याची सोय करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत जवळच्या सिंचन शाखा कार्यालयात हे अर्ज करावे लागणार आहेत.

शेतीसाठी पाणी हवंय, मग 'ही' प्रक्रीया केल्यावरच मिळणार हक्काचे पाणी
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 1:41 PM
Share

नाशिक : यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने जलसाठे तुडूंब भरलेले आहेत. जलशयामध्ये शेती सिंचनासाठीदेखील राखीव पाणी ठेवण्याची सोय असते मात्र, दरवर्षी पाणीटंचाईमुळे शेतीपिकांना पाणी पुरवठा करणे शक्य नसते. (Availability of water) यंदा स्थिती ही बदलेली आहे. त्यामुळे नाशिक विभागाच्या पाठबंधारे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा उपयोग (Water for Agriculture,) शतीसाठी करु दिला जाणार आहे. याकिरीता कार्यंक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

(Nashik Irrigation Department,) नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकक्षेतील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर या तालुक्यांतील जलाशय, नदीनाले, कालवा या लघु प्रकल्पांमधून प्रवाही, उपसा व ठिबक सिंचन पद्धतीने रब्बी हंगाम 2021-22 करिता पाण्याची सोय करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत जवळच्या सिंचन शाखा कार्यालयात हे अर्ज करावे लागणार आहेत.

रब्बी हंगामासह फळपिकांनाही मिळणार पाणी

यंदा समाधानकारक पावसामुळो पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ठराविक क्षेत्रावररील नमुना नंबर 7 प्रवर्गात रब्बी हंगामातील संरक्षित सिंचनाकरिता सर्व प्रकराच्या उभ्या पिकांना यामध्ये हंगामी पीके, फळबाग यांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरी या साठ्यातील पाण्याचा आधार शेतरकऱ्यांना मिळणार आहे. याकरिता पाटबंधारे कार्यक्षेत्रातील शेतकरी, संस्थाकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

पिण्यच्या पाण्याचे नियोजन करुन शेतीला पाणी

नागरिकांना पिण्याचे पाणी राखीव ठेऊनच शेतीसाठी आणि इतर औद्योगिक कारखान्यांसाठी उर्वरीत पाणी दिले जाणार आहे. धरणातील पाणी हे उन्हाळा अखेरपर्यंत पुरवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानंतरच हा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतलेला आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई असते म्हणून केवळ पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य दिले जाते. मात्र, जलसाठ्यातील काही पाणी हे शेती सिंचनासाठीही राखीव असते याचा उपयोग यंदा शेतकऱ्यांना होईल असा विश्वास पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अधिकारी निकम यांनी केला आहे.

काय आहेत अटी ?

मंजूर क्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने घ्यावे. तसेच ज्या लाभार्थ्यांना नमुना नंबर 7 वर ज्यांना पाण्याचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी अर्जासोबत सध्याचा वैध 7/12 उतारा जोडणे बंधनकारक आहे. तसेच सहकारी पाणी वापर संस्थेस तिच्या लागवडीखालील क्षेत्राच्या प्रमाणात स्वतंत्ररित्या पाणी कोटा मंजूर करण्यात आला असून, या संस्थांच्या वापर लाभक्षेत्रातील कोणत्याही वैयक्तिक लाभ धारकाला नमुना नंबर 7 वर पाणी पुरवठा केला जाणार नाही. त्याकरीता सहकारी पाणी वापर संस्थेतील लाभधारकांनी संस्थेकडेच पाणी मागणी नोंदविणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा वापर हा सुक्ष्मसिंचन पध्दतीने करण्यावरच भर द्यावा लागणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

ज्या शेतकऱ्यांकडे विजेची थकबाकी आहे. किंवा ज्यांचे नाव काळ्या यादीत आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. कालव्यावरील मंजूर उपसा धारक व्यतिरिक्त इतर कुणीही इलेक्ट्रीक मोटारी, ऑईल इंजिन ठेवून अथवा पाईप लाईनव्दारा पाणी घेण्याचा प्रयत्न संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही केली जाणार आहे. (Project water for agriculture this year, decision due to excessive rains)

संबंधित बातम्या :

पूर्वसूचना करुनही पंचनामे प्रलंबित, शेतकऱ्यांनो ‘ही’ काळजी घ्या तरच मिळेल नुकसानभरपाई

पेरणी यंत्र एक अन् फायदे अनेक, वेळेची बचत शिवाय उत्पादनात वाढ

‘आयवीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जम्न

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.