AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आयवीएफ’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जन्म

तंत्रज्ञानाचा फायदा शेतीशी निगडीत बाबींना करण्याच्या दृष्टीनेदेखील सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. आता भारतात अशीच एक नवीन टेक्निक शास्त्रज्ञानी यशस्वीरित्या पशुसाठी विकसित केली आहे. या तंत्रपध्दतीचा जगात इतर ठिकाणी वापर झाला असला तरी भारतामध्ये आयवीएफ टेक्निकचा वापर करून पहिल्यांदाच म्हशीचे गर्भाधारण (Pregnancy) करण्यात आले आणि यशस्वीरित्या पारडूचा जन्म देखील झाला आहे.

'आयवीएफ' तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्यांदाच म्हशीची गर्भधारणा, गोंडस पारडूला जन्म
आयवीएफ टेक्निकने म्हशीची गर्भधारणा
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 6:56 PM
Share

मुंबई : देशात पशुपालनाचा विकास व्हावा आणि दूध उत्पादनात वाढ व्हावी म्हणून सरकार तर विविध योजना राबवत आहेच. शिवाय वेगवेगळ्या संस्था, वैज्ञानिक हे देखील प्रयोग करीत आहेत. तंत्रज्ञानाचा फायदा शेतीशी निगडीत बाबींना करण्याच्या दृष्टीनेदेखील सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. आता भारतात अशीच एक नवीन टेक्निक शास्त्रज्ञानी यशस्वीरित्या पशुसाठी विकसित केली आहे. या तंत्रपध्दतीचा जगात इतर ठिकाणी वापर झाला असला तरी (Pregnancy of buffalo with ‘IVF’ technology) भारतामध्ये आयवीएफ टेक्निकचा वापर करून पहिल्यांदाच म्हशीचे गर्भाधारण  करण्यात आले आणि यशस्वीरित्या पारडूचा जन्म देखील झाला आहे.

पशुसंवर्धन हा शेतीचा जोडव्यवसाय आहे. ज्याप्रमाणे शेतीपध्दतीमध्ये बदल होत आहेत अगदी त्याचप्रमाणात पशुपालन व्यवसयामध्ये बदल होत आहेत. आता या म्हशीत आयवीएफ टेक्निकणे गर्भधारना करण्यात आली ती म्हैस बन्नी जातीची आहे. या जातीच्या म्हशी अधिककरुन गुजरात राज्यात अधिक प्रमाणात आहेत. या यशासोबतच भारताने OPU-IVF तंत्रज्ञानात (Technology) पुढचा पल्ला गाठला आहे. ज्या म्हशीवर ह्या टेक्निकचा वापर करण्यात आली ती म्हैस गुजरात (Gujarat) मधील एका शेतकऱ्याची आहे. सोमनाथ जिल्ह्यातील (Somnath District) धनेज गावाच्या विनय ह्या शेतकऱ्याची ही म्हैस होती. ही सर्व प्रक्रिया विनयच्या फार्मवर जाऊन करण्यात आली.

कशी साधली ही किमया ?

वैज्ञानिकांनी गर्भधारणेसाठी तीन म्हशींची निवड केली होती. या तिन्हीही म्हशी विनय ह्या शेतकऱ्याच्या सुशीला ऍग्रो फार्ममधीलच होत्या. बन्नी जातीच्या तीन म्हशी गर्भधारणेसाठी निवडण्यात आले होते. शास्त्रज्ञांनी म्हशीच्या अंडाशयातून बीज काढण्याच्या यंत्राद्वारे (इंट्राव्हेजिनल कल्चर डिव्हाइस-IVC) 20 अंडी काढली. तीन म्हशींपैकी एका म्हशीतून 20 अंडी आयव्हीसी प्रक्रियेद्वारे (IVC Technology) काढण्यात आली.

डोनर म्हशीकडून  काढलेल्या 20 अंड्यांपैकी 11 भ्रूण बनवण्यात आले. त्यापैकी नऊ भ्रूणांची स्थापना झाली, ज्यातून तीन आयव्हीएफ गर्भधारणा अस्तित्वात आल्या. दुसऱ्या डोनरकडून पाच अंडी काढण्यात आली, ज्यातून पाच भ्रूण तयार करण्यात आले. पाचपैकी चार भ्रूण रोपण करण्यासाठी निवडले गेले आणि या प्रक्रियेतुन दोन गर्भधारणा झाल्या. तिसऱ्या डोनरकडून चार अंडी काढण्यात आली, दोन भ्रूण विकसित करण्यात आले आणि त्यांची स्थापना करून एक गर्भधारणा करण्यात आली. ह्या प्रक्रियेतून सहा गर्भधारणा करण्यात आल्या आहेत ज्यापैकी एक गर्भधारनेपासून एका पारडू जन्माला आले.

स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल का ?

तंत्रज्ञानाच्या वापराने शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. पण त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही होणे तेवढेच महत्वाचे आहे. हा भारतामधील पहिलाच प्रयोग आहे. मात्र यामुळे पशुधन वाढण्यास मदत तर होणारच आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी समृध्द होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. (Buffalo conceived with IVF technology, first experiment in India)

संबंधित बातम्या :

विक्रमी दर देणाऱ्या हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनची आता काय अवस्था ?

पीकांना रानडूकरांचा धोका, मग असे करा पीक संरक्षण..!

खाद्यतेलाच्या दरावरुन पुन्हा केंद्र सरकारचे राज्यांना पत्र, तेलबियांच्या साठ्यावर लक्ष केंद्रीत करा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.