ही कसली दुश्मनी ? 33 एकरातील भात पिकाच्या गंजीला लावली आग, भंडाऱ्यात असे काय झाले?

नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकाची जोपासना केली मात्र, अज्ञातांच्या तावडीतून ते सुटका करु शकले नाहीत. एकाच वेळी तालुक्यातील तब्बल 33 एकरातील भात पिकाच्या लावलेल्या गंजी अज्ञातांनी जाळल्या आहेत. विशेष: म्हणजे एका गंजीच्या ठिकाणी चिठ्ठी आढळून आली असून आम्ही गंजी जाळत असल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे.

ही कसली दुश्मनी ? 33 एकरातील भात पिकाच्या गंजीला लावली आग, भंडाऱ्यात असे काय झाले?
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 5:11 PM

भंडारा : एकीकडे शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. (Damage to paddy fields) भात शेतीच्या कापणी दरम्यानच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. असे असताना शेतकऱ्यांनी गुडघाभर चिखलात जाऊन कापणी केली. मात्र, पावसामध्ये सातत्य असल्याने शेतकऱ्यांनी भात शेतीच्या गंजी लावून ठेवल्या. नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकाची जोपासना केली मात्र, (paddy fields burnt by unidentified persons) अज्ञातांच्या तावडीतून ते सुटका करु शकले नाहीत. एकाच वेळी तालुक्यातील तब्बल 33 एकरातील भात पिकाच्या लावलेल्या गंजी अज्ञातांनी जाळल्या आहेत. विशेष: म्हणजे एका गंजीच्या ठिकाणी चिठ्ठी आढळून आली असून आम्ही गंजी जाळत असल्याचा उल्लेख त्यामध्ये आहे.

हंगामाच्या सुरवातीपासून शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मोठ्या कष्टाने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीच्या गंजी लावल्या होत्या. पावसाची उघडीप झाली की, मळणी कामे केली जाणार होती. पण त्यांच्या स्वप्नांचा चुराडा एका रात्रीत झाला आहे. नेमके यामगचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, 8 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

17 शेतकऱ्यांच्या गंजीचा समावेश

पावसापुर्वी कापणी झालेल्या 33 एकरातील भातशेतीच्या गंजी किन्हीझमोखे शिवारात लावण्यात आल्या होत्या. 17 शेतकऱ्यांनी एकाच ठिकाणी या गंजी लावल्या होत्या. मात्र, शनिवारी रात्री अज्ञात इसमांनी या गंजीला आग लावली. यामध्ये 17 शेतकऱ्यांचे तब्बल 8 लाख 25 हजाराचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भातशेतीची जोपासना करण्यासाठी एकरी 10 हजार रुपये खर्ची करावे लागले आहेत. तर भर पावसात कापणीची कामे शेतकऱ्यांनी केली होती. यातून उत्पादन तर सोडाच पण कोणत्या कारणावरुन हे कृत्य करण्यात आले याचा देखील अंदाज शेतकरी बांधू शकत नाहीत.

यामुळे केली एकाच ठिकाणी साठवणूक

भंडारा जिल्ह्यात अद्यापही धान खरेदी केंद्र हे सुरु झालेले नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी खरेदी केंद्र होईस त्याच ठिकाणी गंजी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी धानाचे पुंजणे शेतातच ठेवले आहेत. ज्या दिवशी धान खरेदी केंद्र सुरू होईल त्या दिवशी चुरणे करू असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तालुक्यातील किन्ही-मोखे या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गंजी ह्या शेतातच होत्या. शनिवारी रात्री अज्ञात इसमाने 33 एकर शेतीतील धानाच्या गंजीला आग लावून जाळून टाकले.

घटनास्थळी पोलीसांना सापडली चिठ्ठी

शनिवारी रात्री घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. यावेळी पंचनामाही करण्यात आला. मात्र, दरम्यान पोलीसांना या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली असून ‘आम्हीच गंजी जाळल्या’ असा एवढाच उल्लेख करण्यात आला होता. ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत सर्व गंजी ह्या जळून खाक झाल्या होत्या. मंडळ अधिकारी हलमारे यांनी जळालेल्या धान्याच्या पुंजण्याचे पंचनामे केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी गंजीला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस 33 एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या :

आता ‘मागेल त्याला ठिबक सिंचन’, 80 टक्के अनुदानाचा असा घ्या योजनेचा लाभ

सोयाबीनचे दर वाढूनही आवक घटलेलीच, शेतकरी अपेक्षित दराच्या प्रतिक्षेतच

महाअभियनातून वाढणार रेशीम उद्योग, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ