मत्स्यव्यवसायात क्रांती : ‘ई-फिश मार्केट अ‍ॅप’ मुळे मासे उत्पादकांना थेट फायदा

| Updated on: Oct 07, 2021 | 11:44 AM

मत्स्यव्यवसायही त्यामधीलच एक असून आता या व्यवसयात क्रांती घडेल असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कमी गुंतवणुकीत अधिकाचा फायदा यामुळे ग्रामीण भागातही मत्स्यव्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता मासे उत्पादकांसाठी 'ई- फिश मार्केट अ‍ॅप' उदयास आले आहे.

मत्स्यव्यवसायात क्रांती : ई-फिश मार्केट अ‍ॅप मुळे मासे उत्पादकांना थेट फायदा
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : शेती हा मुख्य व्यवसाय असला तरी अनेक पुरक व्यवसायामुळे शेतकरी हा सधन होत आहे. मत्स्यव्यवसायही त्यामधीलच एक असून आता या व्यवसयात क्रांती घडेल असा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कमी गुंतवणुकीत अधिकाचा फायदा यामुळे ग्रामीण भागातही मत्स्यव्यवसाय हा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता मासे उत्पादकांसाठी ‘ई- फिश मार्केट अ‍ॅप’ उदयास आले आहे. (E- Fish Market) आसाममध्ये या अ‍ॅपची निर्मीती झाली असून याचा फायदा सर्व मासे उत्पादकांना होणार आहे.

मध्यंतरी आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे ओढावलेले संकट यामुळे सर्वकाही डबघाईला आले होते. या दोन्ही संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये परस्थिती ही अटोक्यात होती. कोरोनाच्या काळातही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सुरळीत कामकाजामुळे आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे. त्यामुळेच गेल्या काही काळापासून केंद्र आणि राज्य सरकारांकडून ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे.

देशातील पहिले ‘ई- फिश मार्केट अ‍ॅप’

मत्स्य उत्पादनाबरोबरच त्याला योग्य मार्केटही उपलब्ध होणे गरजेचे आहे. व्यवसाय कोणताही असो मार्केट हा महत्वाचा भाग झाला आहे. आसाम राज्याने मत्स्यव्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने हे ई- फिश मार्केट अॅप ची निर्मिती केली आहे. त्याचा उपयोग आता देशभरातील उत्पादकांना होणार आहे. भारतामधील हे पहिले अॅप असून मंगळवारी हे लॅांन्च करण्याता आलेले आहे.
भारताचे पहिले ई-फिश मार्केट अॅप लाँच

‘ई- फिश मार्केट अ‍ॅप’ चा फायदा

‘ई- फिश मार्केट अ‍ॅप’ मुळे खरेदीदार आणि विक्रेता यांना चांगले व्यासपीठ मिळणार आहे. उत्पादकांना मार्केट कुठे उपलब्ध आहे याची माहिती होणार आहे. तर विक्रेत्यांना योग्य मालाची पारख करता येणार आहे. अॅपच्या एकाच प्लॅटफॉर्मवर मासे, जलचर कृषी उपकरणे, औषधे, माशांचे खाद्य आणि मासे बियाणे हे ऑनलाइन खरेदीदारास आणि विक्रेत्यांना मदत करेल. हे अ‍ॅप अ‍ॅक्वा ब्लू ग्लोबल अ‍ॅक्वाकल्चर सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडने राज्य मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहकार्याने विकसित केले होते.

शेतकऱ्यांचीही भटकंती संपुष्टात

शेतीला जोड व्यवसाय म्हणून मत्स्यव्यवसाय हा वाढत आहे. मात्र, मासेचे बियाणे, औषधे, खाद्य याची योग्य माहिती नसल्याने शेतकऱ्यांची भटकंती होत होती. आता ऑनलाईलद्वारे याची खरेदी शक्य होणार आहे. या अ‍ॅपमुळे आता शेतकऱ्यांना बसल्या ठिकाणी या सर्व गोष्टींची माहिती होणार आहे. शिवाय योग्य बाजारपेठही उपलब्ध होणार असल्याने उत्पादनात वाढ होणार हे नक्की. या अ‍ॅपमध्ये गोठलेले मासे, कोरडे मासे, माशांचे लोणचे आणि गोड्या पाण्यातील प्रक्रिया केलेली मासे उत्पादने याची माहिती देखील असणार आहे.

योग्य किंमत अन् योग्य उत्पादन

मत्स्यपालन करणाऱ्या समुदायाच्या सदस्यांना त्यांच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळण्यास याचा उपयोग होणार आहे तर मध्यस्थांचा सफाया देखील होणार आहे. (Fisheries Revolution: Fish growers directly benefit from e-fish market app)

संबंधित बातम्या :

काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? योजनेतील बदल शेतकऱ्यांच्या हिताचा

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात

विदर्भातील महामंडळाच्या गोदामात 24 लाख क्विंटल धान्य पडून, राज्य-केंद्राच्या वादात धान्याचे नुकसान