AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात

साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

साखर उत्पादनात भारत जगात दुसऱ्या स्थानावर ; यंदाही विक्रमी निर्यात
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 5:30 PM
Share

मुंबई : देशात वर्षागणिक साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. यंदा (India) भारतातील साखर कारखान्यातून (Sugar Factory) तब्बल 72. 3 लाख टन साखरेची निर्यात झालेली आहे. साखर  व्यवसायात असलेल्या ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (ISTA)या संस्थेने ही माहिती दिली आहे. तर साखर उत्पादनात भारताचा ब्राझील पाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. गतवर्षीचा गाळप हंगाम हा 30 सप्टेंबर रोजी संपला होता. या हंगामात देशातील कारखान्यांनी 72. 3 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.

‘एस्टा’ च्या म्हणण्यानुसार 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या हंगामात भारताने इंडोनेशियाला सर्वाधिक साखर निर्यात केली आहे. सन 2020-21 मध्ये एकूण निर्यातीपैकी 70.6 लाख टन साखर निर्यात झाली आहे. तर सुमारे 1,66,335 टन साखर दान केली जात असल्याचे समोर आले आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे 1.5 दशलक्ष टन किंमतीचे निर्यात सौदे करण्यात आले आहेत. आगामी अधिवेशनात अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे भारतीय साखर कारखाने हे या संधीचा फायदा घेतील. शिवाय पुढील हंगामातही 60 लाख टनांपर्यंत साखर निर्यात देशातून होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नवीन हंगामासाठी 15 लाख टन साखरेचे सौदे

एस्टाच्या म्हणण्यानुसार, 2020-21 या वर्षात सुमारे 60 लाख टन साखर सरकारी अनुदानासह आणि 7.85 लाख टन अनुदानाशिवाय निर्यात करण्यात आली. इंडोनेशियाला सर्वाधिक निर्यात 18.2 लाख टन असून त्याखालोखाल अफगाणिस्तानला (6,69,525 टन), संयुक्त अरब (यूएई) ला (5,24,064 टन) तर सोमालियाला (4,11,944 टन) निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

चालू हंगामातही भारताकडे निर्यातीची संधी

दुसरीकडे थायलंडमध्येही साखरेचे उत्पादन हे वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यांचे उत्पादन हे वाढलेले आहे. असे असले तरी भारताच्या सर्वसाधारण उत्पादनाच्या 30 ते 35 लाख टन हे त्यांचे उत्पादन कमीच राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातही साखर निर्यात करण्यात भारतातील साखर कारखान्यांना मोठी संधी आहे. शिवाय थायलंडची साखर ही जानेवारी 2022 मध्ये बाजारात दाखल होणार आहे.

निर्यातीमधून अधिकचे उत्पन्न

उत्पादनात घट झाल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. ब्राझीलचे उत्पादन हे जगात सर्वाधिक असले तरी जानेवारी 2022 नंतर आणि एप्रिल 2022 नंतरच ब्राझीलची साखर बाजारपेठेत येणार आहे. त्यापुर्वी साखर निर्यातीचा फायदा हा भारतामधीलच साखर कारखान्यांना होणार आहे. वाढीव उत्पादनाबरोबरच साखरेची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखर कारखान्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगामाला 15 ऑक्टोंबरपासून सुरवात

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप 15 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहेत. त्या अनुशंगाने गत महिन्यात मंत्रा मंडळाची बैठक झाली असून यामध्ये हा निर्णय झाला आहे. (India ranks second in the world in sugar production; Record exports this year too)

संबंधित बातम्या :

सोयाबीनच्या काढणीला वेग ; दराचे भवितव्य अंधारात, काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

पालघर शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : वाडा कोलम तांदळाला भौगोलिक मानांकन, जागतिक बाजारपेठेतही मागणी

हिवाळ्यात होईल दुध उत्पादनात घट, अशी घ्या जनावरांची काळजी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.