Soybean Crop : सोयाबीन दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत, काय आहे बाजारपेठेतले वास्तव?

हंगामाच्या सुरवातीपासून खरिपातील सोयाबीन हे मार्केटमध्ये चर्चेत राहिलेले आहे. हंगामाच्या सुरवातीला घटलेल्यामुळे तर अंतिम टप्प्यात विक्रमी दरामुळे. सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत. त्यामुळे विक्री करुनही शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसानच झाले. आतापर्यंत सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही.

Soybean Crop : सोयाबीन दरात चढ-उतार, शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत, काय आहे बाजारपेठेतले वास्तव?
सोयाबीनचे दर स्थिर असले तरी आवक मात्र सुरुच आहे.
| Edited By: | Updated on: Mar 17, 2022 | 10:04 AM

वाशिम : हंगामाच्या सुरवातीपासून खरिपातील (Soybean Market) सोयाबीन हे मार्केटमध्ये चर्चेत राहिलेले आहे. हंगामाच्या सुरवातीला घटलेल्यामुळे तर अंतिम टप्प्यात विक्रमी दरामुळे. सबंध हंगामात सोयाबीनचे दर हे काही टिकून राहिलेले नाहीत. त्यामुळे विक्री करुनही शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसानच झाले. आतापर्यंत (Soybean Rate) सोयाबीन खरेदी-विक्रीमधून शेतकऱ्यांचे नुकसान इथपर्यंत ठिक होते पण गेल्या महिन्यात दरात झालेल्या चढ-उताराचा अंदाज व्यापाऱ्यांनाही आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून 7 हजार 300 रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केलेल्या मालाची पुढे (Traders) व्यापाऱ्यांनी प्लॉटस् धारकांना विक्रीच केलेली नाही. वाढीव दराची अपेक्षा शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापऱ्यांनादेखील होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून 7 हजारावर सोयाबीन हे स्थिरावलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही अडचणीत असल्याचे चित्र आहे. आता विक्री की साठवणूक हा प्रश्न व्यापाऱ्यांना देखील पडलेला आहे.

असे वाढत गेले सोयाबीनचे दर

हंगामाच्या सुरवातीला जे चित्र सोयाबीनचे होते त्यामध्ये अमूलाग्र बदल झाला आहे. हंगामाची सुरवातच 4 हजार 800 पासून झाली होती. शिवाय उत्पादन घटूनही ही अवस्था असल्याने भविष्यात दरवाढ होईल ही अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याळेच अनेकांनी विक्री न करता साठवणूकीवर भर दिला. दरम्यान, दीपावली नंतर सोयाबीने उठाव घेतला. डिसेंबर महिन्यामध्ये 6 हजार 200 रुपये क्विंटलपर्यंत दर होते. परंतू, जानेवारीच्या अंतिम टप्प्यापासून पुन्हा दरात वाढ सुरु झाली. फेब्रुवारीमध्ये तर सोयाबीनला विक्रमी असा 7 हजार 500 रुपयांचा दर मिळाला होता. हे सर्व असले तरी शेतकऱ्यांनी कधी मोठ्या प्रमाणात आवकच होऊ दिली नाही. त्यामुळे दर टिकून तरी राहत होते किंवा त्यामध्ये वाढ होत होती. सध्या सोयाबीनला 7 हजार रुपेय दर मिळत आहे.

व्यापाऱ्यांनाही दरवाढीची अपेक्षा

केवळ शेतऱ्यांनाच नाही तर व्यापाऱ्यांनाही सोयाबीन दरवाढीची अपेक्षा आहे. कारण कमी दरात शेतकऱ्यांकडून खरेदी आणि पुढे अधिकच्या दरात विक्री हे व्यापाऱ्यांचे सूत्र असते पण शेतकऱ्यांकडून अधिकच्या दरात घेतलेले सोयाबीन आता कमी दराने कसे विकावे असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवढी दरवाढीची प्रतिक्षा आहे तेवढीच व्यापाऱ्यांना अशी अवस्था आहे. व्यापाऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक तर केली आहे पण दरात वाढ झाल्यावरच त्याचे चीज होणार आहे.

साठवणूकीतले सोयाबीन बाजारात

वाढीव दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी यंदा संपूर्ण हंगामात सोयाबीनची साठवणूक केली होती. मध्यंतरी 7 हजार 500 चा दर मिळताच अनेकांनी सोयाबीनची विक्री केली होती. आता पुन्हा दर स्थिर झाले आहेत. शिवाय काही दिवसांनी उन्हाळी सोयाबीनची आवक सुरु झाली तर पुन्हा दर घसरतील या धास्तीने शेतकरी साठवणूकीतले सोयाबीन विक्रीसाठी बाहेर काढत आहे. असे असले तरी अनेकांना दरवाढीची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या 10 दिवसात दरातील चढ-उतार पाहता शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केलेलीच फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या   :

Onion Rate : कांद्याची विक्रमी आवक, चाकण बाजार समितीमध्ये दिवसागणिक दरात होतेय घट..!

Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?

Video: 50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? Ajit Pawar यांनी स्पष्टचं सांगितलं, संभ्रम दूर करणारा व्हिडीओ पाहिला का?