Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?

Holi Festival : सणामुळे राज्यातील मुख्य बाजार समित्यांचे व्यवहार राहणार बंद, शेतीमालाचे काय?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अशाप्रकारे सूचना देण्यात आली आहे.

सध्या खरिपासह रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना आता राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार हे होळीनिमित्त बंद असणार आहेत. मध्यंतरी दीपावलीमुळे काही दिवस व्यवहार हे बंद होते तर आता होळीमुळे राज्यातील लातूर, लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे.

राजेंद्र खराडे

|

Mar 17, 2022 | 5:05 AM

लातूर : सध्या खरिपासह (Rabi Season) रब्बी हंगामातील शेतीमालाची आवक वाढली आहे. शिवाय खरेदी केंद्राचाही शेतकऱ्यांना लाभ होत आहे. खरिपातील सोयाबीन, तूर या मुख्य पिकांची तर रब्बी हंगामातील हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. असे असताना आता राज्यातील (Agricultural Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार हे (Holi Festival) होळीनिमित्त बंद असणार आहेत. मध्यंतरी दीपावलीमुळे काही दिवस व्यवहार हे बंद होते तर आता होळीमुळे राज्यातील लातूर, लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक या बाजार समित्यांचा समावेश आहे. दरवर्षी होळीनिमित्त बाजार समित्या ह्या बंद असतात. यामध्ये पणन महामंडळाचा महत्वाची भूमिका असते पण स्थानिक पातळीवर हा निर्णय बाजार समिती प्रशासनच घेते. त्यामुळे काही बाजार समित्या ह्या दोन दिवसासाठी तर काही 5 दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र, चांगलीच पंचाईत होणार आहे.

कोणत्या बाजार समितीचा काय आहे निर्णय?

होळी निमित्त लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे 5 दिवस बंद असणार आहेत. गुरुवारपासून येथील व्यवहार बंद राहणार आहेत. सलग पाच दिवस व्यवहार बंद असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. भाजीपाला आणि फळांचे व्यवहार सुरु राहणार आहेत. तर कांदा नगरी असलेल्या लासलगावातील कांद्याचे व्यवहार हे दोन बंद राहणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सलग पाच दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बाजार समित्यांच्या निर्णय हा स्थानिक पातळीवर झालेला आहे.

पुणे बाजार समित्याचे व्यवहार राहणार सुरु

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. मध्यंतरी दीपावली दरम्यान येथील बाजारपेठ ही तीन दिवस बंद होती. मात्र, सध्या रब्बी आणि खरीप हंगामातील पिकांची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शेतीमालाचे काय होणार?

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार बंद राहणार असले तरी भाजीपाला आणि इतर किरकोळ व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यातच काही बाजार समित्या ह्या 5 दिवस तर काही 2 दिवस बंद राहणार आहेत. महत्वाचे म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे व्यवहार हे सुरुच राहणार आहेत. आता या बंद नंतर शेतीमालाचे काय दर राहणार हे पहावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Poultry Business : कुक्कुटपालन व्यवसायाला पुन्हा घरघर, सरकारचा हस्तक्षेपानंतरच मिळणार नवसंजीवनी..!

Cotton Rate: हंगामाच्या अंतिम टप्प्यात कापसाला विक्रमी दर, नेमका फायदा कुणाला?

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढले दर, सोयाबीनचे काय चित्र?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें