AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : संसद परिसर बनला आखाडा, कृषी कायद्यांवरून हरसिमरत कौर बादल आणि रवनीत बिट्टू भिडले, पाहा व्हिडीओ

हरसिमरत कौर यांनी संसद भवन परिसरात नव्या कृषी कायद्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होत्या. यावेळी काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही निदर्शने बोगस असल्याचं सांगितलं.

VIDEO : संसद परिसर बनला आखाडा, कृषी कायद्यांवरून हरसिमरत कौर बादल आणि रवनीत बिट्टू भिडले, पाहा व्हिडीओ
हरसिमरत कौर बादल आणि रवनीत बिट्टू
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 1:26 PM
Share

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांवरून (New Agricultural Laws) मागच्या अनेक महिन्यांपासून राजकारण तापलेलं आहे. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन (Farmers Protest Delhi) सुरूच आहे. असं असताना कृषी कायद्याचे पडसाद संसदेतही उमटत आहेत. आज शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर बादल (Harsimrat Kaur Badal) आणि काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू (MP Ravneet Bittu) यांच्यात संसद भवन परिसरातच कृषी कायद्यांवरून खडाजंगी पाहायला मिळाली. (Former Minister Harsimrat Kaur Badal and Congress MP Ravneet Bittu clashed over agricultural laws in the Parliament House premises) दोन्ही नेत्यांच्या खडाजंगीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हरसिमरत कौर आणि रवनीत बिट्टू कृषी कायद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

शिरोमणी अकाली दलच्या खासदार आणि माजी मंत्री हरसिमरत कौर यांनी संसद भवन परिसरात नव्या कृषी कायद्यांविरोधात हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होत्या. यावेळी काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही निदर्शने बोगस असल्याचं सांगितलं.

काय म्हणाले रवनीत बिट्टू?

हरसिमरत यांची निदर्शने म्हणजे ढोंग असल्याचं रवनीत बिट्टू यांनी यावेळी म्हटलं. ”हरसिमरत कौर यांनी स्वतः मंत्री असताना या कायद्यांना विरोध केला नाही. त्यांनी स्वतः या विधेयकांना पारित केलं. जेव्हा शेतकऱ्यांमध्ये कायद्यांविरोधात रोष वाढत गेला तेव्हा हरसिमरत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. जेव्हा विधेयक पारित होत होतं तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला? आता केवळ दाखवण्यासाठी तुम्ही कृषी कायद्यांचा विरोध करत आहात,” असं काँग्रेस खासदार रवनीत बिट्टू यांनी म्हटलं.

हरसिमरत कौर बादल यांचं प्रत्युत्तर

रवनीत बिट्टू यांच्या आरोपांना हरसिमरत कौर बादल यांनीही तेवढंच आक्रमक प्रत्युत्तर दिलं. ”विधेयक पारित होत असताना राहुल गांधी कुठे होते असं यांना विचारा. ते संसद सोडून गेले होते आणि काँग्रेसने वॉकआऊट केल्यामुळेच ही विधेयके पारित होण्याला मदत झाली.” असं प्रत्युत्तर हरसिमरत कौर यांनी दिलं. (Former Minister Harsimrat Kaur Badal and Congress MP Ravneet Bittu clashed over agricultural laws in the Parliament House premises)

इतर बातम्या :

Maratha Reservation : मोदी सरकारचा मुळावर घाव, थेट 102 व्या घटनादुरुस्ती कायद्यात बदल करणार!

राहुल गांधींसोबतच्या फोटोची जोरदार चर्चा, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.