शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; यंदाच्या गाळप हंगामाचा लवकर श्रीगणेशा, प्रतिटन इतका भाव मिळणार

Sugarcane Farmers : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. यंदा लवकरच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. तर यंदा भाव काय असेल याविषयीचा अंदाजही समोर येत आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; यंदाच्या गाळप हंगामाचा लवकर श्रीगणेशा, प्रतिटन इतका भाव मिळणार
गाळप हंगाम
| Updated on: Sep 02, 2025 | 5:09 PM

शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. राज्यात ऊसाचा गाळप हंगाम दिवाळीच्या मुहूर्तावरच सुरू होणार आहे. यंदा वरुण देवता अगोदरच प्रसन्न झाली आहे. ऊसाचे उत्पादन यंदा चांगले राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा 15 दिवस अगोदर हंगाम सुरू होणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.

केंद्राकडून ऊसाला काय भाव?

केंद्र सरकारने यंदा ऊसाला किमान हमीभाव (FRP) जाहीर केला आहे. 2025-2026 च्या हंगामासाठी ऊसाची एफआरपी 10.25 टक्के उताऱ्यासाठी 3550 रुपये प्रति टन निश्चित करण्यात आली आहे. तर त्यापुढील 1 टक्क्यासाठी प्रत्येक टनाला 346 रुपये मिळतील. उतारा घटल्यास प्रति टन हा भाव 346 रुपये कमी होईल. तर 9.5 टक्क्यांपेक्षा कमी उतारा आला त प्रतिटनाचा किमान दर 3461 रुपये असेल. शेतकऱ्यांना यंदा चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. पिकाच्या उतारानुसार ही किंमत ठरणार नाही.

गेल्या वर्षी शेतकऱ्यांना फटका

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुका दिवाळीच्या टप्प्यात आल्या होत्या. त्याचवेळी 15 ते 20 दिवस हंगाम लांबला होता. तोडणी मजुरांपासून ते वाहतुकीपर्यंत गेल्यावर्षी खोळंबा झाला होता. या अडचणींचा सामना मजूरांपासून ते कारखानदारांपर्यंत सर्वांना फटका बसला होता. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा याच कालावधीत येत आहेत. त्याचा खोडा बसण्याची भीती आहे. पण हंगाम लांबणीवर पडणार नसल्याने गाळप प्रक्रिया अडकण्याची शक्यता नाही. याविषयी 25 सप्टेंबर रोजी मंत्र्यांच्या उपसमितीची बैठक होण्याची शक्यता आहे. आता मराठा आंदोलनावर तोडगा निघाल्याने सरकारवरील संकट कमी झाले आहे.

ऊस गाळप परवान्यासाठी साखर कारखान्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल. 2025-26 या हंगामासाठी 1 सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर असून, तत्पूर्वी ते सादर करणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांना परवाना अधिकाऱ्यांनी गाळप परवाना दिल्याशिवाय गाळप करता येणार नाही. विना परवाना ऊस गाळप सुरू केल्यास कारवाईचा करण्याचा इशारा साखर आयुक्तांनी दिला आहे.